दादरमधील शिवाजी पार्क हे खेळाचे मैदान की मनोरंजन केंद्र यावर वाद असतानाच युती सरकारने उच्च न्यायालयाच्या निकालाच्या आधारे वर्षांतील ४५ दिवस या मैदानात सभा, समारंभांना परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे शासकीय आदेशात शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने हा आदेश जारी केला आहे. बाल दिन (दोन दिवस), महाराष्ट्र दिन (पाच दिवस), स्वातंत्र्य दिन (पाच दिवस), प्रजासत्ताक दिन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन (सात दिवस), दसरा मेळावा, गुढीपाडवा, मराठी भाषा दिन, जगन्नाथ रथयात्रा (सात दिवस), गणेश विसर्जन वाहनतळ (तीन दिवस) व शासन निश्चित करेल अशा समारंभांसाठी पाच दिवस राखीव ठेवण्यात आले आहेत.

Supreme Court verdict on minor abortion
तिसाव्या आठवडयात गर्भपातास परवानगी; अल्पवयीन बलात्कार पीडितेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
Vendors throw vegetables, Protest against nmc, Nashik Municipal Corporation, Demand Space for Business, nashik news, vendors protest news, marathi news, protest in nashik,
नाशिक महापालिकेसमोर भाजीपाला फेकून आंदोलन – अतिक्रमण निर्मूलन कारवाईचा निषेध
Patna High court
मुलांसाठी पत्नीच्या पालकांकडून पैसे मागणे हा हुंड्याचा प्रकार नाही; उच्च न्यायालयाचा पतीला दिलासा
chief justice dy chandrachud
सरन्यायाधीश कोर्टात आले आणि आपली खुर्ची सोडून चक्क समोरच्या स्टूलवर जाऊन बसले; ‘या’ कृतीचं होतंय सर्वत्र कौतुक!

उच्च न्यायालयाच्या अटीच्या प्राधीन राहूनच हे मैदान उपलब्ध करून दिले जाणार आहे.

शिवसेनेला दिलासा

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी मिळविण्याकरिता दरवर्षी उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी लागत असे. या निर्णयातून शासनाने शिवसेनेला दिलासा दिला आहे.