जगातल्या प्रमुख चार फॅशन वीकमध्ये नावाजला गेलेला एक सोहळा म्हणजे न्यूयॉर्क फॅशन वीक. जगभरातल्या फॅशन प्रेमींचं आणि ब्रॅण्डचं लक्ष लागून राहिलेल्या या सोहळ्यात दरवर्षी सप्टेंबर आणि फेब्रुवारी असे दोन भाग असतात.  सप्टेंबर २०१६च्या मोसमात वैशाली शदांगुळे ही मराठी फॅशन डिझायनर तिचं कलेक्शन सादर करणार आहे. वैशाली एस या ब्रॅण्डअंतर्गत यंदा ‘एसएस १७ – द क्वाएट फ्लोज द थ्रेड’ हे कलेक्शन सादर करणार आहे. या कलेक्शनमधून वैशालीला एका साध्याशा धाग्याचा महावस्त्रापर्यंतचा प्रवास दाखवायचा आहे. त्यासाठी ती खादी, चंदेरी, महेश्वरी या धाग्यांवर काम करणार आहे. वैशालीचा हातखंडा असणारी साडी न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये नसेल परंतु त्याऐवजी भारतीय पारंपरिक धागे आणि हातमागावरचे कापड या दोन्हींचा वापर करून डिझाइन केलेले परदेशी धाटणीचे कपडे ती रॅम्पवर दाखवणार आहे.

फॅशन शो आणि रॅम्पने काहीशा नाकारलेल्याच मराठमोळ्या कपडय़ांना आणि साजशृंगाराला वैशालीने प्रथमच रॅम्पवर ओळख दिली. महाराष्ट्राची ओळख असलेल्या पैठणी साडय़ांवर प्रयोग करून तिने सादर केलेले पैठणी कलेक्शन विशेष गाजले. यानंतर मराठमोळे खण, चंदेरी साडय़ा, ज्यूट अशा प्रकारच्या पारंपरिक वस्त्रांवर आधारित कलेक्शन्स सादर करून वैशालीने रॅम्पला वेगळी ओळख दिली. फक्त हे कपडेच नव्हेत तर गजरा, टिकली, नथ, बांगडय़ा, जोडवे, कुंकू या रॅम्पने कधीही न पाहिलेल्या पण अतीव सुंदर अशा शृंगारसाधनांची ओळखही वैशालीने फॅशनविश्वाला करून दिली.

ipl 2024 gujarat titans beautiful mystery girl compared with hollywood actress ana de armas shubman gill reaction viral
VIDEO : पृथ्वी शॉच्या गर्लफ्रेंडवर शुबमन गिलचा डोळा? नेटिझन्स म्हणाले, “ओहह भावा…”
Raigad, Explosion in company, Mahad MIDC,
रायगड : महाड एमआयडीसीतील कंपनीमध्ये स्फोट, कोणतीही जीवितहानी नाही
Dead ants found in samosas
किळसवाणा प्रकार! कुरकुरीत समोस्यामध्ये आढळल्या मेलेल्या मुंग्या; दिल्ली विद्यापीठाच्या कॅन्टीनमधील Video Viral
several injured in multiple stabbing-shooting incident
सिडनीतल्या मॉलमध्ये चाकू हल्ला, चार जणांचा मृत्यू, अनेक लोक जखमी; संशियाताला पोलिसांनी ठार केल्याचं वृत्त

न्यूयॉर्क फॅशन वीकसाठी डिझायनर्सना आधी त्यांनी तयार केलेले कलेक्शन आणि प्रत्यक्ष काम याचे सादरीकरण करावे लागते.

पण वैशालीचे कौशल्य आणि तिच्या कामातले प्रावीण्य पाहून न्यूयॉर्क फॅशन वीकने केवळ तिच्या वेबसाइटवरचे कलेक्शन पाहून तिला या सोहळ्यासाठीचे आमंत्रण दिले आहे.

भारतीय वस्त्रप्रावरणांबद्दल जागतिक स्तरावर कुतूहल आहेच. आपले हे पारंपरिक कपडे मागास नाहीत तर तेही आजच्या काळानुरूपच आहेत. फक्त ते आपण सिद्ध करायला हवे. हाच कायम माझा प्रयत्न असतो. भारतीय वस्त्रांना जागतिक दर्जावर ओळख मिळवून देण्यासाठी न्यूयॉर्क फॅशन वीकपेक्षा उत्तम व्यासपीठ दुसरे कुठले असू शकेल? त्यामुळे इथे आपले कलेक्शन सादर करण्याची संधी मिळणे हा केवळ एक उत्तम योग आहे.

– वैशाली शदांगुळे, फॅशन डिझायनर