‘ब्लॅक अ‍ॅन्ड बुल’ चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन
कोटय़वधींचा व्यवसाय करणारे अनेक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्यात समाजाला प्रबोधन करणाऱ्या चित्रपटांची संख्या फारच कमी आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे वास्तव चित्रपटाच्या माध्यमातून दाखवून त्यांनी आत्महत्या करू नये, या दृष्टीने चित्रपट निर्मिती करण्याचे काम सुरू झाले असून तो सुद्धा लवकरच प्रदर्शित होईल, असे मत दिग्दर्शक गिरीश मोहिते आणि अभिनेता मंगेश देसाई यांनी व्यक्त केले.
ज्येष्ठ चित्रकार चंद्रकांत चन्ने  यांनी कवी लोकनाथ यशवंत यांच्या बैल या कवितांवर आधारित शेतकऱ्यांच्या जीवनावर चित्रे रेखाटली. या विषयावर चित्रपटाची निर्मिती करण्यात येत असून गिरीश मोहिते यांनी त्याचे दिग्दर्शन तर मंगेश देसाई यांनी त्यात भूमिका केली आहे. चित्रकला महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन मंगेश देसाई आणि गिरीश मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला कवी लोकनाथ यशवंत, चंद्रकांत चन्ने , प्रमोदबाबू रामटेके, महाविद्यालयाचे अधिष्ठाता विनोद मानकर उपस्थित होते.
विदर्भात ४८ अंश सेल्सिअस तापमानात शेतकरी राबतो आणि त्याच्या पदरी आत्महत्या हे वास्तववादी चित्र मनाला वेदना देणारे आहे. शेतकऱ्यांना समाजात प्रतिष्ठा असली तरी शेतमजुरांचे काय, ते बैलासारखे राबतात त्यामुळे त्यांचेही दुख या चित्रपटातून मांडण्यात आले आणि ते चित्राच्या माध्यमातून समोर आले आहे. त्यांना काय वेदना सहन कराव्या लागतात या विषयावर लवकरच चित्रपट निर्मिती केली जाणार असल्याचे गिरीश मोहिते यांनी सांगितले.
लोकनाश यशवंत यांनी चित्रपटावर मत मांडले. चंद्रकांत चन्ने यांनी प्रास्ताविक तर संजय भाकरे यांनी संचालन केले.

संदेशनशील अभिव्यक्ती
चित्रकार चंद्रकांत चन्ने यांनी बैल ही कविता स्वतच्या चित्रपृष्ठासह पोत, रंगासह ब्लॅक बुल रूपात आणली आहे. ही चित्रे कवीच्या आणि कवितेच्या अनुभवाशी जोडणारी आहेत. चित्रकारांची संदेशनशील अभिव्यक्ती आहे. त्यांनी ‘ब्लॅक’मध्ये मूळ गाभा साकारला आहे. अनेक खेळ उत्सव, कृषी व्यवस्था आणि त्यातील वास्तव सांगणारा हा घटक म्हणून निर्मितीच्या केंद्रस्थानी आहे. आजच्या वर्तमानाचे वास्तव रूप सांगणाऱ्या ‘ब्लॅक बुल’ मालिकेतील २५ ते ३० चित्रे आहेत.

vasai suicide marathi news
वसई: चित्रफित तयार करून तरुणाची आत्महत्या, पोलिसाने धमकी दिल्याचा चित्रफितीत आरोप
boyfriend sent bride nude photos on groom mobile phone to break marriage
वधूचे अश्लील छायाचित्र नवरदेवाच्या मोबाईलवर पाठवले, हळदीच्या दिवशी प्रियकराच्या कृत्याने मोडले लग्न
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…