कंपन्यांमधील सीएसआर निधीतून सेवानिवृत्त कामगारांना आजार उपचारासाठी मेडिक्लेमची आरोग्य सुविधा मिळावी, यासाठी १० मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या तयारीसाठी सिडको व सातपूर कामगार वसाहतीत ८ व ९ फेब्रुवारी रोजी प्रचार प्रबोधन मेळाव्यांचे आयोजन बॉश सेवानिवृत्त कल्याण मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
मंडळातर्फे सोमवारी सकाळी साडेदहा वाजता सातपूर येथील सप्तशंगी देवी मंदिर सभागृहात आणि मंगळवारी सकाळी १० वाजता जुने सिडकोतील शिवाजी चौकातील महात्मा फुले सभागृहात कामगार मेळावे होणार असल्याची माहिती सचिव पी. पी. परदेशी, देवराम सैंदाणे यांनी दिली आहे. मेळाव्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष चेतन पणेर, सरचिटणीस सुभाष पाटील यांनी केले आहे.