मनसेतून नुकतेच काही दिवसांपुर्वी शिवसेनेत प्रवेश केलेल्या शिवसेनेच्या एका इच्छुक उमेदवाराची शुक्रवारी जेलरोड येथील शिवाजीनगर भागात तलवार आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या घटनेमागे राजकीय कारणे असल्याची वंदता आहे. तथापि ही बाब पोलिसांनी नाकारली असून जुन्या वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे.
नाशिकरोडमधील जेल रोड भागात ही घटना घडली. त्यात सुरेंद्र सिध्दार्थ शेजवळ (वय ३५, रा. लक्ष्मीज्योती सोसायटी श्रमीकनगर कॅनालरोड,जेलरोड) याचा मृत्यू झाला. शेजवळ याने अलिकडेच शिवसेनेत प्रवेश केला होता. प्रभाग क्र. १८ मधुन त्याने शिवसेनेकडुन इच्छुक उमेदवार म्हणुन महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरवात देखील केली होती. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास शेजवळ व त्याचा मित्र विक्रम पोरजे हे त्यांच्या दुचाकीवरून जेलरोडमार्गे घरी जाण्यासाठी निघाले होते. त्रिवेणी पार्ककडे ते पोहचताच पाठीमागून आलेल्या एका अज्ञात कारने त्यांच्या अ‍ॅक्टिवाला पाठीमागून धडक दिली़. शेजवळ व पोरजे हे दोघेही खाली पडले. यावेळी हल्लेखोर गाडीतून उतरले व शेजवळ पळून जात असताना त्याला त्यांनी गाठले. त्याच्यावर तलवार व कोयत्याच्या साहाय्याने वार केले. त्यातच त्याचा मृत्यू  झाला़. यानंतर हल्लेखोर फरार झाले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

दरम्यान, या हल्ल्यात मरण पावलेल्या शेजवळ यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. २००७ मध्ये दिग्रसकर खूनप्रकरणी सुरेंद्र शेजवळवर खुनाचा गुन्हा दाखल होता. महापालिका पोटनिवडणुकीत मनसेकडून जुना प्रभाग ३५ (नवीन प्रभाग १८) मधून त्यांच्या आईने निवडणूक लढवली होती. त्यावेळी प्रचारात पिस्तुलाचा धाक दाखवण्याचा  गुन्हाही त्याच्याविरुद्ध दाखल झाला होता.  राजकीय कारणातून ही हत्या झाल्याची चर्चा असली तरी पोलिसांनी मात्र त्यास नकार दिला आहे. हल्लेखोरांची ओळख पटली असून चार पथके त्यांच्या शोधासाठी रवाना करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे.

congress in gujarat loksabha
गुजरातमधील काँग्रेसचे ‘जायंट-किलर’ रूपालांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात; भाजपाचं गणित बिघडणार?
BJP and TMC
पश्चिम बंगालमध्ये टीएमसी अन् भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदानावेळी राडा; एकजण गंभीर जखमी
Rape of accused wife
चंद्रपूर : रक्षक नव्हे राक्षसच! पोलीस हवालदाराचा आरोपीच्या पत्नीवर बलात्कार; पोलीस प्रशासनात खळबळ
reaction of krupal tumane, MP, eknath shinde, ramtek lok sabha constituency, lok sabha election 2024
उमेदवारी नाकारल्यानंतर शिंदे गटाच्या खासदाराची पहिली प्रतिक्रिया,म्हणाले “हो मी दुःखी, पण….”