नाशिकमध्ये भाजपला एकहाती सत्ता मिळाल्यानंतर महापौरपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते, अशी चर्चा सुरू असतानाच आता भाजप आणि शिवसेनेकडून स्वीकृत नगरसेवक म्हणून कुणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपकडून तीन आणि दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या शिवसेनेकडून दोन स्वीकृत सदस्यांची निवड केली जाणार आहे. आता हे दोन्ही पक्ष कुणाला संधी देतात, याची उत्सुकता नाशिकच्या राजकारणात आहे.

नाशिक महानगरपलिका निवडणुकीत भाजपने ६६ जागा जिंकून आपणच ‘किंग’ असल्याचे सिद्ध केले आहे. भाजपला एकहाती सत्ता मिळाली आहे. आता सदस्य संख्येनुसार भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे स्वीकृत नगरसेवक पदासाठी पक्षाला संधी मिळाली आहे. तर शिवसेना क्रमांक दोनचा पक्ष ठरला आहे. त्यामुळे शिवसेनेचे दोन सदस्य या पदाच्या शर्यतीत असणार आहेत.

Nandurbar lok sabha 2024 election, congress, Rajni Naik, adv gopal padavi
नंदुरबारमध्ये काँग्रेस धक्क्याच्या तयारीत ? – रजनी नाईक यांनी उमेदवारी अर्ज घेतल्याने चर्चा
congress
सांगलीत मैत्रीपूर्ण लढत की माघार ? दिल्लीच्या निर्णयाची काँग्रेस नेत्यांना प्रतीक्षा
Sangli Friendly fight will be decided by congress in Delhi tomorrow
सांगलीतील मैत्रीपूर्ण लढतीचा उद्या दिल्लीत निर्णय
Mahavikas aghadis discussion is continues for Jalgaon Raver seat Sampada Patils name from Thackeray group
जळगाव, रावेर जागेसाठी मविआचा काथ्याकूट सुरुच, ठाकरे गटाकडून संपदा पाटील यांचे नाव चर्चेत

महापालिकेतील एकूण १२२ सदस्यांपैकी पाच स्वीकृत सदस्यांची निवड करता येते. भाजपचे ६६ सदस्य आहेत. कोट्यानुसार, भाजपला तीन स्वीकृत सदस्यांची निवड करावी लागणार आहे. तर ३५ जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या शिवसेनेला दोन स्वीकृत सदस्यांची निवड करता येणार आहे. भाजपकडून पक्षाचे माजी शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, विजय साने, गोपाळ पाटील, प्रा. सुहास फरांदे यांच्यात रस्सीखेच आहे. तीन जागांवर कुणाची वर्णी लागते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तर

एकूण १६ सदस्य असलेल्या स्थायी समितीमध्ये १२२ सदस्य संख्येला १६ ने भागल्यास ७.६२५ सदस्यांमागे एक सदस्य असे गणित समोर येते. याचाच अर्थ सात नगरसेवकांमागे एका नगरसेवकाला स्थायी समितीमध्ये स्थान मिळणार आहे. स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत बहुमतासाठी नऊ सदस्यांची आवश्यकता आहे. त्यात भाजपकडे संख्याबळ असल्याने या पदाच्या निवडणुकीतही पक्षासमोर कोणतीही अडचण येणार नाही, असे बोलले जाते.

दुसरीकडे पक्षाने संपूर्ण बहुमत प्राप्त केल्याने आता महापौरपदासाठी दावेदारी सुरू झाली आहे. महापालिकेसाठी पहिल्या अडीच वर्षांसाठी महापौरपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाले आहे. या गटातून पक्षातील ज्येष्ठ नगरसेविका रंजना भानसी, प्रा. सरिता सोनवणे, माजी नगरसेवक सुरेश खेताडे, माजी नगरसेवक पुंडलिक खोडे, रुपाली निकुळे हे पाच उमेदवार निवडून आले आहेत. महापालिकेच्या नगरसेवकपदावर सलग पाच वेळा निवडून आलेल्या आणि ज्येष्ठतेनुसार पक्षश्रेष्ठींनी विचार केल्यास रंजना भानसी या महापौरपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. पक्षातील प्रमुख नेते या पदासाठी कोणाला संधी देतात, याकडेही सर्वांचे लक्ष आहे.