धन्वंतरी पूजन उत्साहात

दीपोत्सवातून सुदृढ आरोग्याचा संदेश देणाऱ्या धनत्रयोदशीनिमित्त शहर परिसरात वैद्यकीय मंडळीकडून धन्वंतरीचे पूजन करण्यात आले. यंदा राज्य शासनाने धनत्रयोदशीला राष्ट्रीय आयुर्वेद दिन म्हणून जाहीर केल्याने उत्साहाला विविधरंगी कार्यक्रमांची किनार लाभली. दरम्यान, धन्वंतरी पूजनानंतर सर्वाना लक्ष्मीपूजनाचे वेध लागले आहेत. यानिमित्त बाजारपेठ सजली असून गृहोपयोगी वस्तू, भ्रमणध्वनी, इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक उपकरणे, वाहन तसेच वास्तू खरेदीवर सवलतींचा वर्षांव होत आहे.

Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
loksatta Health Special article, nutrition, food, pregnancy period
Health Special: गरोदरपणात किती खावं? काय खावं?
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
goa mango farmers deploy jamun to fight
फक्त १० रुपयांच्या जांभळांनी वाचवा आंब्याची बाग? शेतकऱ्याने सांगितला माकडांच्या हल्ल्यापासून वाचण्याचा हटके जुगाड!

तेजाचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीपोत्सवात धनत्रयोदशीनिमित्त शहरात आयुर्वेद तसेच वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींनी धन्वंतरी मूर्तीची विधिवत पूजन केले. लाह्य़ा, बत्तासे, दूध यांचा नैवेद्य दाखवत आरती करण्यात आली. घरोघरी धने, खडीसाखर यांचा नैवेद्य दाखवण्यात आला. राष्ट्रीय आयुर्वेद दिवसाचे औचित्य साधत निमा नाशिक शाखेच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भोसला विद्यालयापासून ते कॅनडा कॉर्नपर्यंत वृक्षदिंडी काढण्यात आली.  दिंडीची सांगता झाल्यानंतर समर्थ मंगल कार्यालयात श्री धन्वंतरीचे पूजन करण्यात आले. दिंडीत ढोलवादनासह ग्रंथमिरवणूक व योगाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आली. तसेच अन्य काही संस्थांकडून आयुर्वेदिक जनजागृती शिबिरासह व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आयुष विभागाच्या वतीने धन्वंतरीपूजन कुलसचिव के. डी. चव्हाण यांनी केले.

दरम्यान दीपोत्सवाचा जल्लोष शिगेला पोहोचला असताना आता लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज आदींची जय्यत तयारी सुरू आहे. अश्विन अमावस्या अर्थात साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधण्यासाठी ग्राहकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन सराफ बाजार सज्ज झाला आहे.

एक ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांपासून बाजीराव मस्तानी, पारंपरिक आभूषणे, बानु-म्हाळसा विशेष, सरस्वती यासह विविध मालिकांमधील आभूषणे, मोत्यांचे अलंकार यावर आकर्षक सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. याशिवाय पूजेच्या उपकरणात नावीन्यता आणत चांदीच्या उपकरणांना कुंदन वर्क आदींची सजावट करण्यात आली आहे. या दिवसाचे व्यापारी व व्यावसायिकांसाठी अधिक महत्त्व असते.

या दिवशी खतावण्या व चोपडय़ांसह धनाची पूजा करताना त्यांच्यामार्फत आपली दुकाने व कार्यालये फुलांनी सुशोभित करण्यावर प्रामुख्याने भर दिला जातो. सर्वसामान्य नागरिकदेखील फुलांची सजावट करण्यास मागे राहत नाही. एकूणच या दिवशी फुलांना असणारी मागणी लक्षात घेऊन शेतकरी वर्गाने त्यांची लागवड करण्याची तजवीज दीड ते दोन महिन्यांपूर्वी केली होती. लक्ष्मीपूजनाच्या आधी ग्रामीण भागातून मोठय़ा प्रमाणात झेंडूची फुले बाजारात विक्रीसाठी दाखल होतील. फुलांबरोबर केरसुणी खरेदी करण्यास प्राधान्य दिले जात आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराघरांत केरसुणीला लक्ष्मीच्या स्वरूपात पूजले जाते.

नव्या वस्तूंच्या खरेदीसाठी लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधण्याचा अनेकांचा प्रयत्न आहे. सराफ बाजार, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहन दुकानांमध्ये नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात आगाऊ नोंदणी करून ठेवली असून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही वस्तुरूपी लक्ष्मी घरी आणण्याचे नियोजन केल्याचे दिसत आहे.

महागाईची काहीशी ओरड असली तरी खरेदीवर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही. लक्ष्मीपूजन व भाऊबीजेच्या पाश्र्वभूमीवर, बाजारपेठांमधील खरेदीचा माहौल कायम आहे.

रविवारी लक्ष्मीपूजनाचे मुहूर्त

  • सकाळी ९.३० ते ११.०० (लाभ)
  • सकाळी ११.०० ते ११.३० (अमृत)
  • दुपारी २.०० ते ३.३० (शुभ)
  • सायंकाळी ६.३० ते ८.०० (शुभ)
  • रात्री ८.०० ते ९.१५ (अमृत)