वेगवेगळ्या आकारातील रंगीत साप, छोटा भीम, कार्टून जगतातील ओळखीचे काही चेहरे, डॉल्फिन, व्हेलमासा, विविध प्राणी व पक्ष्यांच्या आकारातील पतंगांनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले. शिवसेनेतर्फे रविवारी आयोजित पतंग महोत्सवात बालगोपाळांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली.

आगामी महापालिका निवडणुकांचा विचार करत शिवसेनेने विविध उपक्रमांची आखणी करण्यास सुरुवात केली आहे. त्याचा एक भाग म्हणजे पतंग महोत्सव. गंगापूर रस्त्यावरील सावरकरनगर पुलाजवळ असलेल्या सुयोजित व्हेरीडीयन व्हॅलीजमध्ये महोत्सव उत्साहात पार पडला. महापालिकेच्या मागील निवडणुकीपूर्वी झालेला पतंगोत्सव यंदाही निवडणुकीआधीच होत आहे. शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते व इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दुपारी महोत्सवाला सुरुवात झाली. वारा आणि गर्दीचा अंदाज घेत पतंगपटूंकडून ‘एक से बढकर एक’ पतंग आकाशात उडवण्यास सुरुवात झाली. या निमित्ताने नाशिककरांना गुजरातमधील पतंगबाजीची प्रात्यक्षिके पाहायला मिळाली. महोत्सवाची रंगत वाढावी यासाठी गाण्यांच्या तालावर पतंगी आकाशात सोडल्या जात होत्या. सर्वात मोठा पतंग व सर्वात लहान पतंग या महोत्सवाचे वेगळेपण ठरले. या वेळी लहान मुलांसाठी बालगणेश, छोटा भीम, डायनासोर, मिकी माऊस, वाघ, सिंह, नाग, हत्ती, मगर, बेडूक, डॉल्फिन, व्हेलमासा, ऑक्टोपस अशा विविध आकार व प्रकाराचे रंगीबेरंगी पतंग उडवण्यात आले. महोत्सवात आंतरराष्ट्रीय पतंग क्लब, अशोक डिझायनर काइट क्लब, निसर्ग काइट क्लब, वडोदरा काइट क्लब, एम. एच. काइट क्लब आदी सहभागी झाले. भव्य आकारातील पतंग आकाशात विहरत असताना अनेकांनी भ्रमणध्वनीमध्ये ते क्षण टिपले. लहान मुलेही पतंग घेऊन महोत्सवात सहभागी झाली.

murder of girlfriend, mumbai,
मुंबई : प्रेयसीच्या हत्येप्रकरणी ३० वर्षीय व्यक्तीला अटक
ladu prasad
Ram Navami 2024 : १,११,१११ किलोचे लाडू अयोध्येला पाठवणार, राम नवमीसाठी देशभर भाविकांमध्ये उत्साह!
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
Mata Mahakali Yatra in Chandrapur to Commence on 14 April
१४ एप्रिलपासून माता महाकालीच्या यात्रेला सुरूवात; एक महिना चालणार यात्रा, तयारी पूर्ण