आठवडय़ातील दुसरा प्रकार, स्थानिकांमध्ये भीती
शहर परिसरात वाहन जाळपोळीचे सत्र सुरूच असून, दोन दिवसांपूर्वी ज्या ठिकाणी वाहनांची जाळपोळ झाली, त्याच डीजीपीनगरमध्ये शुक्रवारी मध्यरात्री पुन्हा एकदा वाहने जाळण्याचा प्रकार घडल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेत सहा वाहने भस्मसात झाली. पोलिसांची जनमानसातील प्रतिमा मलीन करण्याचा समाजकंटकांचा प्रयत्न असल्याचा दावा यंत्रणेने केला आहे. या प्रकरणी दोन संशयितांना अटक केली असून मुख्य सूत्रधार फरार आहे. या घटनाक्रमामुळे त्रस्तावलेल्या नागरिकांनी पोलीस आयुक्तांना घेराव घालत पोलीस चौकी उभारण्याची मागणी केली.
दोन दिवसांपूर्वी डीजीपी नगरच्या महालक्ष्मीनगर येथील एका इमारतीच्या वाहनतळातील सहा दुचाकी संशयितांनी पेटवून दिल्या होत्या. शुक्रवारी रात्री याच भागातील निलांजन नील अपार्टमेंटच्या वाहनतळात त्या घटनेची पुनरावृत्ती झाली. मध्यरात्री दोनच्या सुमारास संशयितांनी वाहनतळात उभ्या असणाऱ्या १३ ते १४ गाडय़ांच्या पेट्रोल टाकीच्या नळ्या तोडत ती पेटवून दिली. ही बाब लक्षात आल्यावर जनाबाई गवळी यांनी आरडाओरड करत लोकांना मदतीसाठी बोलावले. नागरिकांनी धाव घेईपर्यंत एका दुचाकीच्या पेट्रोल टाकीचा स्फोट झाला. भाजीपाल्याची हातगाडी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या घटनेची माहिती पोलीस व अग्निशमन विभागाला कळविण्यात आली. अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी येईपर्यंत सहा गाडय़ा जळून खाक झाल्या होत्या. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.
शनिवारी सकाळी घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी पोलीस आयुक्त पी. जगन्नाथन आले असता स्थानिकांनी त्यांना घेराव घातला. परिसरातील समाज मंदिर टवाळखोरांचा अड्डा बनले असून, ते त्वरीत बंद करावे आणि या भागात सुरक्षिततेसाठी पोलीस चौकी उभारण्याची मागणी नागरिकांनी केली. ही मागणी मान्य करत पोलीस आयुक्तांनी जागा निश्चित करत सायंकाळपर्यंत तातडीने पोलीस चौकी सुरू होईल, असे आश्वासन दिले. आ. सीमा हिरे, नगरसेवक तानाजी जायभावे यांनीही घटनास्थळी भेट देत नागरिकांशी चर्चा केली.

पोलिसांचा वेगळाच दावा
घटनेविषयी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वेगळाच दावा केला. गेल्या दोन वर्षांत अंबड भागात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून प्रयत्न करण्यात आले. गुन्हेगारांवर कारवाई केली गेली. यामुळे जन मानसातील पोलिसांची प्रतिमा मलीन करण्यासाठी गुन्हेगारी पाश्र्वभूमीच्या युवकांनी हे कृत्य केल्याच त्यांनी सांगितले.

three thousand families staying near waldhuni river boycotting lok sabha election, construction within river bed
कल्याणमध्ये वालधुनी नदी परिसरातील तीन हजार कुटुंबीयांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार
onine
नाशिकमध्ये पर्यायी कांदा बाजार सुरू; तरीही शेतकऱ्यांची लूट ?
Sonam Wangchuk
लेख: लडाखवासींची लोककेंद्री विकासासाठी हाक
heavy traffic in patri pool area in kalyan
कल्याण : पत्रीपुलामुळे पुन्हा मनस्ताप, आता रस्ते कामामुळे अभूतपूर्व वाहतूक कोंडी