नवी मुंबई महापालिका इ टॉयलेटपाठोपाठ महिलांसाठी आता एसएचई टॉयलेट ही अभिनव संकल्पना राबवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांनी या संदर्भात रिलायन्स फाऊंडेशनसोबत केलेल्या चर्चेमुळे फांऊडेशनच्या माध्यमातून ही स्वच्छतागृहे उपलब्ध होणार असल्याची माहिती, स्थायी समितीच्या सभापती नेत्रा शिर्के यांनी दिली.
शहरात हजारो महिला नोकरी, व्यवसायानिमित्त घराबाहेर असतात. अशा वेळी महिलांना सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहांची कमतरता भासते. या हेतूने रिलायन्स फाऊंडेशनच्या सहकार्याने सीएसआर अंतर्गत १२ एसएचई स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहेत. या स्वच्छतागृहांसाठी प्रत्येकी १० ते १२ लाखांचा खर्च अपेक्षित आहे.