हिंजवडीतील तरुणांचे आंदोलन

Maharashtra News Live in Marathi
यवतमाळ : सिमेंट स्टील गोदामात दरोडा; रखवालदाराची निर्घृण हत्या
Police destroyed Robbers Abandoned Houses, Robbers Using Abandoned Houses to stay, Robbers Using Abandoned hide, Houses to stay, Navi Mumbai, Kopar Khairane Area, robbers in kopar khairane,
जनसहभागातून गर्दुल्ल्यांचा अड्डा उद्ध्वस्त, कोपरखैरणे पोलिसांची कामगिरी 
municipality keeping eye after removing the encroachment on Belpada hill
पनवेल : बेलपाडा टेकडीवरील अतिक्रमण हटविल्यानंतर पालिकेची नजर
Union minister Piyush Goyal, BJP’s candidate for Mumbai North, interacts with supporters. (Express photo by Sankhadeep Banerjee)
पियूष गोयल यांच्या पहिल्याच प्रचारसभेत घुमला मतदारांचा सूर, “मुंबईचा आवाज आता दिल्लीत!”

हिंजवडी गावचा उल्लेख ‘हिंजेवाडी’ असा केल्याच्या निषेधार्थ पिंपरी पालिकेच्या फलकांना काळे फासण्याचे आंदोलन हिंजवडीतील तरूणांनी केले. आयटी कंपन्यांकडून सुरू असलेला हा प्रकार किमान महापालिकेने तरी करू नये, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच झालेल्या चुकीची तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी हिंजवडीकरांनी केली आहे.

जगाच्या नकाशावर ‘आयटी हब’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीचा उल्लेख सातत्याने ‘हिंजेवाडी’ असा करण्यात येतो. त्यामध्ये आयटी कंपन्या, या ठिकाणी काम करणारे अभियंते व येथील अमराठी माणसे आघाडीवर असल्याचे सांगण्यात येते. अशा प्रकारे परस्पर गावाचे नाव बदलण्यास स्थानिक ग्रामस्थांचा तीव्र आक्षेप आहे. यासंदर्भात गावक ऱ्यांनी यापूर्वीच आंदोलन केले होते, तसेच जनजागृती मोहीमही राबवली होती. मात्र, तरीही हा प्रकार सुरूच आहे.

पिंपरी पालिकेने कासारवाडी-नाशिकफाटा येथे उभारलेल्या उड्डाणपुलाजवळ दिशादर्शक फलक आहे. त्यावर ‘हिंजेवाडी’ असा उल्लेख करण्यात आला आहे. या मार्गाचे नुकतेच वाजतगाजत उद्घाटन करण्यात आले. हिंजेवाडी असा फलक पालिकेनेच लावल्याची माहिती ग्रामस्थांना समजल्यानंतर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हिंजवडीतील तरूणांनी बुधवारी या फलकाला काळे फासले. गावचा उल्लेख हिंजेवाडी असा करण्यात येऊ नये, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात, पालिकेत कोणालाही माहिती नव्हती. पत्रकारांनी विचारणा केल्यानंतर अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती घेण्यास सुरूवात केली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी, ‘गुगल’वर हिंजवडीचा मराठीत अर्थ काय, असा प्रश्न विचारल्यास ‘ते घरी परतले नाहीत’ असा अर्थ सांगितला जात होता. सततच्या वाहतूक कोंडीची पाश्र्वभूमी त्यामागे असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. काही दिवसांनंतर मात्र, तो मजकूर हटवण्यात आला होता.

या आंदोलनासंदर्भात आमच्याकडे कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाही. हिंजेवाडी असा चुकीचा उल्लेख असल्यास दोन दिवसात दुरूस्त करण्यात येईल आणि नवीन फलक लावण्यात येतील.

संदेश खडतरे, उपअभियंता, पिंपरी पालिका.