स्वच्छता मोहीम राबवणाऱ्या पिंपरीत शाळांच्या इमारतींची दुरवस्था

आशिया खंडात श्रीमंत असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांच्या काही इमारती मोडकळीस आल्या आहेत. तर अनेक शाळांमध्ये दर्जाहीन सुविधा पुरवल्या जात आहेत. स्वच्छ भारत मोहीम राबविणाऱ्या महापालिकेला स्वत:च्याच शाळांमधील स्वच्छतागृहांमध्ये पाणीपुरवठा करता येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना दरुगधीचा सामना करावा लागत आहे. अनेक शाळांना वर्ग भरवण्यासाठी खोल्या कमी पडत असल्यामुळे एकाच खोलीत दोन-तीन वर्ग भरवावे लागत आहेत.

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
Pimpri road, road development works,
पिंपरी : रस्ते विकासाच्या ९० कोटींच्या कामात ‘रिंग’?
onine
नाशिकमध्ये पर्यायी कांदा बाजार सुरू; तरीही शेतकऱ्यांची लूट ?
series of tremors Navi Mumbai
शहरात हादऱ्यांची मालिका सुरूच, नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या बदलीनंतर नगररचना विभागही सुस्त

उद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवडमध्ये देशाच्या आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून रोजगारासाठी मोठय़ा प्रमाणात नागरिक स्थायिक झाले आहेत. बेताची आर्थिक परिस्थिती असलेल्या सामान्य नागरिकांना मोठय़ा रकमेच्या देणग्या देऊन चांगल्या शाळेत प्रवेश घेता येत नाही. त्यामुळे असे पालक त्यांच्या मुलांचे प्रवेश महापालिकेच्या शाळेतच करतात. सन १९९७ मध्ये महापालिकेमध्ये १७ गावांचा नव्याने समाविष्ट करण्यात आली. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा महापालिकेकडे वर्ग करण्यात आल्या. या शाळा महापालिकेकडे वर्ग करण्यात आल्यानंतर त्या शाळांच्या खोल्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. वाल्हेकरवाडी, बोराडे वस्ती, जाधववाडी, धायरकरवाडी, कुदळवाडी आदी शाळांच्या इमारतीच्या बांधकामांची मुदत संपूनही त्या शाळांमध्ये चिमुकल्यांचे वर्ग भरतात. पिंपरी-चिंचवडमधील शाळांवर नियत्रंण ठेवणायासाठी स्वतंत्र शिक्षण मंडळ असताना शाळांच्या इमारतीची दुरुस्ती होत नसल्याची आणि शिक्षणाचा दर्जा सुधारत नसल्याची शोकांतिका आहे. अपेक्षित कामगिरी होत नसल्यामुळे दिवसेंदिवस महापालिका शाळांमधील विद्यार्थिसंख्या कमी होत आहे.

घसरती पटसंख्या हा महापालिका शाळांमधील चिंतेचा विषय ठरत आहे. शिक्षण मंडळाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना तकलादू असल्यामुळे शाळांमधील परिस्थिती सुधारत नसल्याचे चित्र आहे. शहरात ४१ हजार विद्यार्थी शिकत असलेल्या अनेक शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. स्वच्छतागृहे नावालाच बांधून ठेवण्यात आली आहेत. स्वच्छतागृहांमध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जात नसल्यामुळे ती स्वच्छ राहत नाहीत. खाजगी शाळांबरोबर स्पर्धा करण्याबाबत सांगितले जात असले, तरी महापालिका शाळांना साध्या सुविधा पुरवल्या जात नाहीत. अनेक शाळांमध्ये वर्ग खोल्यांची संख्या कमी असल्यामुळे एकाच खोलीत दोन-तीन वर्ग भरवावे लागतात. शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न गंभीर आहे. वाल्हेरवाडी येथील शाळा दोन रस्त्यांच्या मध्ये असल्यामुळे विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करत शाळेत जावे लागते. या सर्व उणिवांकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन गांभीर्याने पाहत नाही, ही वस्तुस्थिती आहे. धायरकरवाडीमधील शाळेत स्वच्छतागृह नसल्यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांना उघडय़ावर जावे लागते.