पुण्यातील मुठा नदीत उडी मारून एका युवकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना आज (दि. २५) दुपारी दोनच्या सुमारास घडली. पांडुरंग शिवाजी शिंदे (वय २६) असे या युवकाचे नाव असून तो मुळचा उस्मानाबादचा आहे. तो गंभीर जखमी झाला आहे. अग्निशामक दलाच्या पथकाने त्याला नदीतून बाहेर काढले. उपचारासाठी त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रविवारी दुपारी दोनच्या सुमारास पांडुरंग शिंदे याने पुना हॉस्पीटल येथील यशवंतराव चव्हाण पुलावरून मुठा नदीत उडी मारली. त्याचवेळी तेथून जात असलेल्या लोकांनी त्याला पाहिले. अग्निशामक दलाला याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. पांडुरंगने आत्महत्येचा प्रयत्न का केला याची माहिती समजू शकलेली नाही.

BSNL, 4G, 5G, services, Central Government
बीएसएनएलला अजूनही ४ जी, ५ जीची प्रतीक्षा! केंद्र सरकारकडून दिरंगाई
13 year old school boy dies after drowning in private swimming pool
पुणे: खासगी जलतरण तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू
man molests 15 year minor girl in running local train
रेल्वेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग
students clashed again in pune university premises
पुन्हा विद्यार्थी भिडले! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात पुन्हा हाणामारी….