साहित्य :
२ कप डोशाचे आंबवलेले पीठ
स्टफिंगसाठी :
१ मध्यम भोपळी मिरची, उभी पातळ चिरून
१ मध्यम कांदा, उभा पातळ चिरून
१/२ गाजर, उभे पातळ मॅचस्टिकसारखे काप
१/२ वाटी शिजलेल्या नूडल्स
१ चमचा तेल
१ चमचा बारीक चिरलेली लसूण
१/२ चमचा किसलेले आले
१/२ चमचा सोया सॉस
१ हिरवी मिरची बारीक चिरून
इतर साहित्य :
शेजवान सॉस, गरजेनुसार
तेल डोसा बनवताना कडेने सोडण्यासाठी
कृती :
१) कढईत तेल गरम करून त्यात आलं-लसूण आणि मिरची घालून परतावे. नंतर त्यात भाज्या, नूडल्स घालून मिक्स करावे. सोया सॉस घालून टॉस करावे. मिश्रण बाजूला काढून ठेवावे.
२) तव्यावर डोशाचे पीठ पसरवून पातळ डोसा घालावा. कडेने तेल सोडावे. डोसा वरून सकला की १/२ ते १ चमचा शेजवान सॉस पसरवावा. मधे थोडे सारण पसरवून घ्यावे. एका बाजूने डोसा लालसर झाला की रोल करून डोशाचे २ इंचांचे तुकडे करून सव्‍‌र्ह करावे.

चॉकेलट डोसा
साहित्य :
२ वाटय़ा डोसा पीठ
चॉकलेट आवडीनुसार
केळ्याचे पातळ काप
तूप

कृती :
१) तव्यावर पीठ पातळ पसरवून डोसा घालावा.
२) डोसा वरील बाजूने सुकला की वर चॉकलेट किसून घालावे. तूप सोडून डोसा तयार करावा.
डोसा सव्‍‌र्ह करताना तो फोल्ड करून त्यावर केळ्याचे तुकडे घालून सव्‍‌र्ह करावा.

पावभाजी डोसा
साहित्य :
४ वाटय़ा डोशाचे पीठ
१ वाटी कांद्याची पेस्ट
पाऊण वाटी टोमॅटोची प्युरी
१/२ वाटी बारीक चिरलेली भोपळी मिरची
१ चमचा लसूण पेस्ट
२ चमचे लाल मिरची पेस्ट
२ चमचे बटर
१/४ वाटी फ्लॉवर, मटार उकडून कुस्करून घ्यावे.
१ लहान बटाटा, उकडून कुस्करून घ्यावा.
चवीपुरते मीठ
१ चमचा पावभाजी मसाला
चिरलेली कोथिंबीर
कृती :
१) कढईत २ चमचे बटर आणि १ चमचा तेल गरम करावे. लसूण पेस्ट परतावी. त्यावर भोपळी मिरची २-३ मिनिटे परतावी.
२) नंतर कांद्याची पेस्ट घालून व्यवस्थित शिजेस्तोवर परतावे. कांद्याची पेस्ट छान परतली गेली की लाल मिरच्यांची पेस्ट घालून परतावे. नंतर टोमॅटोची प्युरी घालून मंद आचेवर शिजवावे.
३) टोमॅटोचा कच्चा वास गेला की फ्लॉवर, मटार आणि बटाटा घालून मिक्स करावे. भाजी थोडी घट्टसरच ठेवावी.
४) चवीपुरते मीठ आणि पावभाजी मसाला घालून मिक्स करावे. मंद आचेवर भाजी शिजू द्यावी.
५) तव्यावर पातळ डोसा घालावा. वरून डोसा सकला की त्यावर थोडी पावभाजीची भाजी पसरवावी. वरून थोडी कोथिंबीर पेरावी.
६) कडेने थोडे तेल किंवा बटर सोडून डोसा थोडा लालसर होऊ द्यावा.
फोल्ड करून सव्‍‌र्ह करावा.
टीप :
४ काश्मिरी लाल मिरच्या बिया काढून उकळवून घ्याव्यात. मऊ झाल्यावर पेस्ट करावी.
वैदेही भावे – response.lokprabha@expressindia.com