‘लोकसत्ता अर्थसल्ला’ उद्या ठाण्यात

सातत्याने घसरत चाललेले ठेवींवरील व्याज आणि तुलनेत वाढत चाललेली महागाई यांचा तसेच घसरण-तेजीच्या फेऱ्यात अडकलेले भांडवली बाजार व विक्रमी टप्प्यावर पोहोचलेली फंड गंगाजळी यांचा गुंतवणुकीच्या दृष्टीने मेळ कसा घालावयाचा याचा तिढा सोडविण्यासाठी ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ सज्ज झाला आहे.

‘रिलायन्स म्युच्युअल फंड’ प्रस्तुत ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ हा कार्यक्रम रविवार, २० ऑगस्ट रोजी  सकाळी १०.३० वाजता हॉटेल टिप टॉप प्लाझा, एल. बी. एस. रोड, ठाणे (पश्चिम) येथे होईल. कार्यक्रमासाठी प्रवेश सर्वासाठी खुला आहे. कार्यक्रमाकरिता प्रथम येणाऱ्यास प्राधान्य आहे.

सनदी लेखापाल प्रशांत चौबळ हे गुंतवणुकीतून आर्थिक नियोजन साध्य करण्याबाबत यावेळी मार्गदर्शन करतील. गुंतवणुकीच्या विविध पर्यायांची ओळख करून देतानाच त्यांची वैशिष्टय़े, त्यातून मिळणारा परतावा याबाबतची स्पष्टता ते देतील.

शेअर बाजाराची ओळख, त्यातील समभागांच्या मूल्य हालचाली आदींबाबत ‘लोकसत्ता अर्थ वृत्तान्त’चे स्तंभलेखक वसंत माधव कुलकर्णी हे मार्गदर्शन करतील. बाजारातील क्षेत्रीय समभागांचा आढावा व भविष्यातील घडामोडींचा त्यावरील परिणाम हेही ते स्पष्ट करतील. तसेच म्युच्युअल फंड या गुंतवणूकदारांच्या पसंतीच्या पर्यायाबाबतही ते मार्गदर्शन करतील. फंडांचे प्रकार, त्यांची कार्यपद्धतीवरही ते यावेळी भाष्य करतील.

कधी?

  • रविवार, २० ऑगस्ट
  • सकाळी १०.३० वा.

कधी?

  • हॉटेल टिप टॉप प्लाझा, एल. बी. एस. रोड, मुलुंड चेक नाकाजवळ, ठाणे (पश्चिम)

तज्ज्ञ मार्गदर्शक :

  • गुंतवणुकीतून आर्थिक नियोजन प्रशांत चौबळ
  • म्युच्युअल फंड आणि शेअर गुंतवणुकीचा मेळ

वसंत माधव कुलकर्णी

  • सर्वाना प्रवेश विनामूल्य
  • प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य

Disclaimer: Mutual fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.