जागतिक ग्रंथदिनी प्रकाशन; रद्दी पुस्तक विक्रेत्यांचा राज्यव्यापी मेळावा

जीवनावश्यक आणि चैनीच्या वस्तू मिळणाऱ्या दुकानांच्या तुलनेत महाराष्ट्रात साहित्यविषयक पुस्तकांची विक्री करणाऱ्या दालनांची संख्या अगदीच नगण्य आहे. अनेक मोठय़ा शहरांमध्ये तर वाङ्मयीन पुस्तके मिळण्याची सोयच नाही. मोठमोठय़ा मॉलमध्ये बाकी सर्व काही मिळते, पण मराठी पुस्तक मिळत नाही. अशा परिस्थितीत ग्रंथप्रेमी मंडळींना हवी असलेली, परंतु अत्यंत दुर्मीळ असणारी पुस्तके मिळवून देण्याचे कार्य ठिकठिकाणचे रद्दीवाले करीत असतात. मराठी वाचन संस्कृती टिकविणाऱ्या तसेच अनेक दुर्मीळ ग्रंथ गरजूंपर्यंत पोहोचविणाऱ्या अशा रद्दीवाल्यांची समग्र सूची तयार करण्याचे काम बदलापूर येथील स्वायत्त मराठी विद्यापीठाने मराठी साहित्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने हाती घेतले आहे. या सूचीत महाराष्ट्रात विविध ठिकाणी दुर्मीळ पुस्तकांची विक्री करणाऱ्या ग्रंथ विक्रेत्यांची माहिती संकलित केली जाणार आहे. येत्या जागतिक ग्रंथदिनी २३ एप्रिल रोजी ही सूची प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानिमित्त महाराष्ट्रभरातील जुन्या पुस्तकांची विक्री करणाऱ्यांचा मेळावा बदलापूरमध्ये भरविण्यात येणार आहे.

Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for Lok Sabha election expenses pune
जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?

रद्दीत देण्यात आलेली दुर्मीळ पुस्तके वेगळी काढून रद्दीवाले त्यांची विक्री करतात. त्यांच्या या उद्योगामुळे हजारो अमूल्य ग्रंथ नष्ट होण्यापासून वाचले आहेत. त्यामुळे या ग्रंथ विक्रेत्यांची सूची करून त्यांच्या कार्याची व्याप्ती वाढविण्याचा प्रयत्न करीत आहोत, अशी माहिती ग्रंथमित्र श्याम जोशी यांनी दिली.

व्हॉटस्अ‍ॅपवर जुन्या पुस्तकांचा लिलाव

गेल्या तीन वर्षांपासून पुण्यातील समीर कलारकोप या रद्दी विक्रेत्याने व्हॉटस्अ‍ॅप समूह तयार करून त्याद्वारे जुन्या, दुर्मीळ पुस्तकांचा लिलाव सुरू केला आहे. त्या समूहात बृहन्महाराष्ट्रातील १५० ग्रंथप्रेमी आहेत. रोज संध्याकाऴी साडेपाच वाजता या समूहावर एखाद-दुसरे दुर्मीळ पुस्तक लिलावासाठी मांडले जाते. पुस्तकाविषयी जुजबी माहिती, त्याची एकूण पाने, मुखपृष्ठ आणि किमतीचा त्यात उल्लेख असतो. समूहातील ग्रंथप्रेमी आवड आणि गरजेनुसार अधिक बोली लावून ते पुस्तक खरेदी करतात. २४ तास लिलावाची मुदत असते. त्यानंतर सर्वाधिक बोली लावणाऱ्या ग्रंथप्रेमीला ते पुस्तक दिले जाते. या लिलावात सर्वसाधारणपणे मराठी आणि इंग्रजी पुस्तके विक्रीसाठी मांडली जातात. रद्दीवाल्यांची सूची तयार झाल्यानंतर हाच प्रयोग अधिक व्यापक प्रमाणात राबविण्याचा विचार आहे. विशिष्ट संकेतस्थळाद्वारे जगभरातील ग्रंथप्रेमींना या चळवळीशी जोडता येऊ शकेल, असे श्याम जोशी यांनी सांगितले.

वाचन संस्कृती टिकविण्यात रद्दीवाल्यांचे योगदान खूपच मोठे आहे. रद्दीवाल्यांमुळे अनेक दुर्मीळ पुस्तके नष्ट होण्यापासून वाचली. त्यामुळे त्यांचा सन्मान होणे आवश्यक आहे. सूची तयार करण्याबरोबरच ग्रंथांचे योग्य मूल्य ठरविणे सुलभ व्हावे म्हणून या रद्दीवाल्यांसाठी प्रशिक्षण वर्गही आयोजित करण्याची योजना आहे.

श्याम जोशी, स्वायत्त मराठी विद्यापीठ, बदलापूर