मीडियावर अगदी मिनिटामिनिटाला काही ना काही घडत असते. मग एखाद्या गोष्टीचे व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडिओ, त्यानंतर त्याची होणारी चर्चा यांना अक्षरशः उधाण येते. असाच एक प्रकार नुकताच घडला असून पश्चिम रशियातील साखलिन (Sakhalin) येथील समुद्रात मच्छीमारांच्या जाळ्यात जवळपास १,१०० किलो वजनाचा Sunfish जातीचा मासा अडकला. मच्छीमारांनी हा मासा बाहेर काढल्यानंतर तो पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती. विशेष म्हणजे हा मासा काहीसा गोलाकार आहे.

माशाचे वजन ११०० किलो असून हा सर्वाधिक मोठ्या जिवंत माशांपैकी एक असल्याचे सांगण्यात येत आहे. हा मासा पाहून अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. येथील एका मच्छीमाराने सांगितले की, आतापर्यंत अनेक मासे पडकले. मात्र समुद्रात इतका मोठा मासा असतो, याबाबत मला अजिबातच कल्पना नव्हती. समुद्रातील काही डॉल्फीन माशांचा आकार १.५ मीटरपर्यंत असल्याचे माहीत आहे. मात्र, सनफीशसारखा इतका मोठा मासा समुद्रात असतो, ते आता प्रत्यक्षात पाहिल्यावर समजले, असे तो म्हणाला. येथील नागरिकही इतका मोठा मासा पहिल्यांदाच पाहात असल्याने माशाला पाहण्यासाठी त्यांनी मोठी गर्दी केली होती.

सध्या या सनफीशची सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात चर्चा होत असून त्याचे फोटो सुद्धा व्हायरल होत आहे. पश्चिम रशियातील साखालिन येथील समुद्रात याआधीही अशाप्रकारचे वेगवेगळे मासे सापडले आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील विजयदुर्गयेथे समुद्रात मच्छीमारी करत असताना मच्छीमार मुनीर मुजावर यांना तब्बल ७०० किलो वजनाचा आणि २० फुट लांबीचा नालिया जातीचा भला मोठा मासा सापडला होता.