अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे जेव्हा आयर्लंडचे राष्ट्राध्यक्ष लिओ वराडकर यांच्याशी संवाद साधत होते तेव्हा एक मजेशीर प्रसंग घडला, ज्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. वराडकर यांच्याशी ट्रम्प फोनवरून संवाद साधत होते. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी आयरिश पत्रकार डोनाल्ड ट्रम्पच्या ओव्हल ऑफिसमध्ये जमले होते. ट्रम्प आपल्या नवीन राष्ट्राध्यक्षांशी काय संवाद साधतात हे ऐकण्याची सर्वच पत्रकारांना उत्सुकता होती, सगळेच कान देऊन हे संभाषण ऐकत होते, तेव्हा एक मजेशीर प्रसंग घडला, ट्रम्प यांनी आपलं संभाषण मध्येच थांबवलं, कारण जमलेल्या पत्रकारांपैकी  एका महिला पत्रकाराचं हास्य त्यांना खूपच आवडलं.  ‘ आपलं  संभाषण ऐकण्यासाठी आयर्लंडची समस्त मीडिया  इथे जमली आहे.’ असं त्यांनी फोनवरून वराडकरांना सांगितलं. ‘ माझ्यासोबत सुंदर हास्य असलेली महिला आहे, जी नक्कीच भविष्यात तुमच्याबद्दल चांगल्या बातम्या देईल.’ असा टोला त्यांनी आपल्या संभाषणात लगावला. त्यावर एकच हाशा पिकला. याचा व्हिडिओ  सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. निवडणुकांच्या काळात माध्यमांनी चक्क डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरुद्ध भूमिका मांडली होती, तेव्हा काही झाले तरी आपल्यावर अमेरिकन माध्यमं टीकाच करतात असं  त्यांचा एकंदर समज आहे. तेव्हा अशा  प्रकारचं वक्तव्य करून त्यांनी एकप्रकारे अमेरिकन माध्यमांना टोलाच लगावला असल्याचं बोललं जात आहे