गेल्या आठवड्यात भाऊबीज झाली. आपल्या लाडक्या भावाला ओवाळताना त्याच्याकडून भेट स्वीकारताना अशाप्रकारचे फोटो अनेकांनी आपल्या सोशल मीडियावर अपलोड केले. एरव्ही आपल्या बहिण भावांऐवजी मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त वेळ घालवणाऱ्या प्रत्येकाने निदान फेसबुकवर तरी अपलोड करण्यासाठी भावंडांसोबत फोटो काढले असणार हे नक्की! पण हे झालं फक्त एकदिवसाचं प्रेम, पण या सगळ्या फोटोंमधून एक फोटो खूपच वेगळा आणि हृद्यस्पर्शी ठरला.

Viral : मंदिराच्या दानपेटीतलं ते प्रेमपत्रं झालं व्हायरल

बंगालमध्ये राहणाऱ्या सम्राट बासू नावाच्या तरूणाने भाऊबीजेचा फोटो फेसबुकवर शेअर केला. सम्राटला मोठी बहिण आहे पण ती दिव्यांग आहे, त्यामुळे तिला चालता येत नाही. तसंच हातानेही ती काम करू शकत नाही, पण आपली महत्त्वाची काम मात्र ती पायानेच करते. भाऊबीजेच्या दिवशी आपल्या हातानं ती भावाला ओवाळू शकली नाही म्हणून पायांच्या बोटात थाळी पकडून तिनं सम्राटचं औक्षणं केलं, अन् पायाच्या अंगठ्यानेच त्याला टिळा लावला.

Viral Video : धक्कादायक! ‘हा’ व्हिडिओ पाहून विकृत माणसाची तुम्हाला चीड येईल

मोठ्या बहिणीचे आशीर्वाद घेण्यासाठी पाया पडल्यानंतर तिने पायानेच त्याला आशीर्वाद दिले. सम्राटनं या खास क्षणाचे फोटो कॅमेरात कैद केलेत. हे हृद्यस्पर्शी फोटो कोणाच्याही डोळ्यात पाणी आणणार असेच होते. सम्राटने हे फोटो शेअर केल्यानंतर अनेकांनी त्या फोटोंवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत, काहींनी तर हे फोटो पाहून आपल्या डोळ्यात पाणी आलं, अशाही प्रतिक्रीया दिल्या. अनेकांनी तर बहिण भावांचं नातं दर्शवणारा हा सर्वोत्तम फोटो असल्याचंही मत मांडलं.