सामान्यत: पालक आपल्या लहान बाळाला खूप जपताना दिसतात. बाळ अगदीच लहान असले तर त्याला हाताळतानाही विशेष काळजी घेतली जाते. मात्र, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ पाहून तुमच्या या समजुतीला खूप मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अनेकजण तर हा व्हिडिओ पाहून संताप व्यक्त करत आहेत. या व्हिडिओत एक व्यक्ती आपल्या चार महिन्यांच्या मुलीला हवेत अक्षरश: गरागरा फिरवत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला या व्यक्तीला कलियुगातील ‘कंस’ वैगैरे म्हणावासेही वाटेल. मात्र, या व्हिडिओमागची पार्श्वभूमी जाणून घेतल्यानंतर हे प्रकरण तितकेसे गंभीर नाही, हे तुमच्या लक्षात येईल. अर्थात व्हिडिओत चार महिन्यांच्या मुलीचे हात किंवा पाय पकडून तिला हवेत वाटेल तसे फिरवणाऱ्या वडिलांची कृती तुम्हाला फारशी रूचणार नाही.

Viral Video : सोशल मीडियावर पूजाची ‘ढिंच्याक’ एण्ट्री! घेऊन आलीय नवीन गाणं

त्यामुळे हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्यावर नकारात्मक प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. हा व्हिडिओ युक्रेनमध्ये चित्रीत करण्यात आला आहे. संपूर्ण व्हिडिओत ही चिमुकली खदाखदा हसतानाच दिसत आहे. त्यामुळे या सगळ्याचा तिला त्रास होत नसून तिला या सगळ्याची मजाच वाटत असावी, असा निष्कर्ष काढायला हरकत नाही. या चिमुकलीच्या वडिलांनी तर अशा व्यायामामुळे माझ्या मुलीची हाडं मजबुत होतील आणि तिच्या शरीरातील रक्ताभिरण प्रक्रिया सुधारते, असा अजब दावा केलाय. माझ्या मुलीला जर त्रास होत असता तर ती रडली असती. पण व्हिडिओत ती स्पष्टपणे हसताना दिसत आहे. अंतराळवीर देखील असाच व्यायाम करतात, असे त्यांनी सांगितले.

वाचा : … या देशात धावते जगातील सर्वात वेगवान बुलेट ट्रेन!