कार्यालय हे अनेकांसाठी दुस-या घरासारखेच असते. कारण आपला बराच वेळ हा कार्यालयात जातो. अनेकांसाठी कार्यालयातील सहकारी हे कुटुंबियांसारखे असतात, पण या सहका-यासोबत कसे वागले पाहिजे या मर्यादा प्रत्येकांनी आखल्या पाहिजे. कार्यालयात एकमेकांत स्पर्धा असते. त्यामुळे, हे सहकारी आपले स्पर्धेकही असतात हे विसरता कामा नये. तेव्हा त्यांच्याशी कोणत्या गोष्टींबाबत चर्चा केली पाहिजे याचे भान आपल्याला असले पाहिजे. म्हणूनच आपल्या सहका-यांशी संवाद साधताना काही विषय या संवादात  येणार नाही याची काळजी घ्या.

वाचा : सेक्स, चॉकलेट आणि दारूपेक्षा लोकांना ‘ही’ गोष्ट अधिक प्रिय

gondia bhandara lok sabha constituency, bjp, ajit pawar ncp, office bearers, reconciliation, booth karyakartas confused, lok sabha 2024, election 2024, polling booth, mahayuti, politics news, marathi news, bhandara gondia news,
तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून… गोंदिया-भंडारात भाजप–राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन, बूथ कार्यकर्ते मात्र संभ्रमात
Electricity Contract Workers, maharashtra, Promised Age Relaxation, Permanent Jobs, Yet to Be Fulfilled, nagpur, electricity workers, marathi news, devendra fadnavis,
कंत्राटी वीज कामगारांना वयात सवलतीचे आश्वासन ठरले ‘जुमला’ !
MPSC Mantra Increasing Opportunities in Public Service Commission Competitive Exams
MPSC मंत्र: लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा- वाढत्या संधी
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’

पगार : आपला आणि आपल्या सहका-याच्या पगारामध्ये तफावत असते हे नेहमी लक्षात घ्या. त्यामुळे, कधीही आपला पगार इतर सहका-यांना सांगू नका.
खर्च : आपला खर्च, गाडी, घराचे इएमआय, कर्जाचे हप्ते अशी कोणतीच माहिती सार्वजिक करणे शक्यतो टाळा. घरातील महागड्या वस्तू, तुमची खरेदी याचा चारचौघांत उल्लेख करणे टाळा.
गॉसिप : कार्यालय म्हटले की एकमेकांच्या खासगी किंवा कामाबद्दल चर्चा, गॉसिपिंग होतच राहणार. पण, या गॉसिपिंगमध्ये भाग घेणे टाळणे हेच शहाणाचे असते. जर तुम्ही यात सहभागी असाल तर इतर सहका-यांसमोर अशा चर्चांचा उल्लेख करणे टाळा. वर्क कल्चरमध्ये कटुता येण्याचे किंवा भांडण होण्याची शक्यता अधिक असते.
वैयक्तिक आयुष्य : ऑफिस व्यतिरिक्तही आपले खासगी आयुष्य असते. या आयुष्यातील भांडणे, प्रेम, तक्रारी याचा चुकूनही उल्लेख ऑफिसमध्ये करू नका. काम आणि खासगी आयुष्य नेहमी वेगवेगळे ठेवा.
मतं : कार्यालयात अनेक सहकारी तुमच्या आवडीचे असतात किंवा नावडीचेही. त्याच्याविषयी तुमची काही मते असतील ती तुमच्यापुरता ठेवा. इतरांना ती सांगू नका.
पासवर्ड: बँक अकाऊंट, सोशल मीडिया ऑफिसच्या पर्सनल फोल्डरचा पासवर्ड अशी गोपनीय माहिती सहका-यांसमोर उघड करू नका.
नवीन नोकरी : तुम्हाला या कार्यालयात त्रास होत आहे, कामचे स्वरुप आवडत नाही किंवा या सगळ्याला कंटाळून तुम्ही नवी नोकरी शोधत आहेत हे कधीच कार्यालयात सांगू नका.

 वाचा : भारतीय कर्मचा-यांना कामापेक्षा ‘या’ गोष्टीत जास्त रस