राज्यघटनेतील पंधराव्या भागात कलम ३२४ ते ३२९ मध्ये देशातील निवडणूक प्रक्रियेसंबंधी महत्त्वाच्या तरतुदी आहेत. कलम ३२४ मध्ये स्वतंत्र निवडणूक आयोगाची तरतूद केली आहे. कलम ३२५ मध्ये संसद आणि राज्य विधिमंडळाच्या निवडणुकीसाठी प्रत्येक भौगोलिक मतदारसंघासाठी केवळ एकाच सर्वसाधारण मतदारयादीची व्यवस्था नोंदवण्यात आली आहे. याच कलमात असेही नमूद केले आहे की, केवळ धर्म, वंश, जात, लिंग यांपकी कोणत्याही आधारे कोणत्याही व्यक्तीस तिचे नाव मतदारयादीमध्ये समाविष्ट करण्यापासून अपात्र ठरविता येणार नाही.
निवडणुकीतील मतदानाबाबत नागरिकांना समान मानण्यात आले आहे. कलम ३२६ नुसार लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या निवडणुका प्रौढ मतदानाच्या आधारावर घेतल्या जातील. याद्वारे भारतातील प्रत्येक नागरिकाला आणि १८ वर्षे वयापेक्षा अधिक असणाऱ्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार प्रदान करण्यात आला आहे, तथापि योग्य कायदेमंडळाद्वारे(संसद किंवा राज्य विधिमंडळ) अनिवास, अस्थिर मानसिकता, गुन्हा व भ्रष्ट गरव्यवहार इ. आधारावर एखाद्या व्यक्तीला कोणत्याही कायद्याने किंवा राज्यघटनेतील तरतुदीमुळे अपात्र ठरविले जाऊ शकते.
निवडणूक आयोग- भारतीय राज्यघटनेच्या कलम ३२४ मध्ये स्वतंत्र निवडणूक आयोगाची तरतूद केलेली आहे. भारतातील संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ही निवडणूक आयोगाच्या हाती सोपविलेली आहे.
रचना- निवडणूक आयोगात मुख्य निर्वाचन आयुक्त आणि राष्ट्रपतींना वाटेल तेव्हा आणखी आयुक्त असतात. या आयुक्तांच्या नेमणुकीसाठी संसदेने केलेल्या कायद्याच्या अधीन राहून राष्ट्रपती त्यांची नियुक्ती करतात.
कार्यकाल- पदभार स्वीकारल्यापासून ६ वष्रे किंवा ६५ वर्षांची वयोमर्यादा (जे आधी संपेल तोपर्यंत) तो पदावर राहू शकतो.
अधिकार आणि काय्रे- भारतीय निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था असून निवडणूक आयोगावर संविधानाने सोपविलेली कामे पुढीलप्रमाणे- १)
मतदारयाद्या तयार करणे, २) मतदारसंघाची आखणी करणे, ३) राजकीय पक्षांना मान्यता आणि मतदान चिन्ह देणे, ४) नामांकन पत्राची छाननी करणे, ५) निवडणूक खर्चावर नजर ठेवणे इ.
निवडणूक आयुक्तांची बडतर्फी- सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला गरवर्तनाच्या किंवा अक्षम्यतेच्या कारणावरून संसदेच्या २/३ बहुमताने ठराव करून पदावरून काढले जाते. त्या पद्धतीनेच मुख्य निवडणूक आयुक्ताला बडतर्फ करता येऊ शकते. मात्र मुख्य आयुक्तांच्या शिफारशीशिवाय राष्ट्रपती इतर आयुक्तांना पदच्युत करू शकत नाही.
दुर्बल घटकांसाठी राखीव मतदारसंघ- राज्यघटनेच्या सोळाव्या भागातील कलम ३३० ते कलम ३३४ अंतर्गत दुर्बल घटकांसाठीच्या राखीव जागांची तरतूद केलेली आहे. भारतीय राज्यघटनेच्या पुढील कलमाद्वारे दुर्बल घटकांसाठी राखीव जागांची तरतूद केली आहे.
कलम ३३० नुसार लोकसभेत अनुसूचित जाती-जमाती यांच्याकरिता जागा राखून ठेवल्या जातील (या जागा २००१ च्या जनगणनेच्या आधारावर २०२६पर्यंत गोठविण्यात आलेल्या आहेत.) कलम ३३१ नुसार आंग्ल-भारतीय समाजाला लोकसभेत योग्य प्रतिनिधित्व
मिळाले नाही असे राष्ट्रपतींना वाटत असेल तर राष्ट्रपती या समाजाचे जास्तीत जास्त २ सदस्य लोकसभेवर नामनिर्देशित करू शकतात. कलम ३३२ नुसार प्रत्येक घटक राज्याच्या विधानसभेत अनुसूचित जाती आणि जमाती यांच्याकरिता जागा राखून ठेवता येतात.
कलम ३३३ एखाद्या राज्याच्या विधानसभेत आंग्ल-भारतीय समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळाले नसल्यास राज्यपाल या समाजाचा १ सदस्य नामनिर्देशित
करू शकतात. (२३वी घटनादुरुस्ती, १९६९)
इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन (ई.व्ही.एम.)- मतदानासाठी वापरल्या जाणाऱ्या मतपत्रिका आणि मतपेटय़ा यांच्याऐवजी मतांची नोंद करण्यासाठी वापरले जाणारे एक विद्युत उपकरण. भारतामध्ये ई.व्ही.एम.चा प्रथम वापर केरळ राज्यातील परूर या विधानसभा मतदारसंघात १९८२सालच्या पोटनिवडणुकीत करण्यात आला.
भारतात ई.व्ही.एम.ची निर्मिती- भारत इलेक्ट्रॉनिक लि. व इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन इंडिया हे या यंत्राचे उत्पादक आहेत. भारताशिवाय भूतान व नेपाळ
या राष्ट्रांमध्ये भारतीय ई.व्ही.एम.चा वापर होतो.
फायदे- १) निवडणुकीमध्ये मतपत्रिका मोजण्याचे काम दीर्घकाळपर्यंत चालत असते. हे क्लिष्ट व त्रासदायक ठरते, मात्र ई.व्ही.एम. यंत्रामुळे मतमोजणीची प्रक्रिया अत्यंत जलद झालेली आहे. २) ई.व्ही.एम. यंत्रामुळे छपाईचा खर्च कमी झाला आहे. कागदाचा वापरही अत्यंत कमी प्रमाणात होऊ लागला आहे. ई.व्ही.एम. मशिन विजेवर अवलंबून असून ते अल्कधर्मी बॅटरींवर चालतात. ३) ई.व्ही.एम.मध्ये कोणताही अनधिकृत फेरबदल करता येत नाही. ई.व्ही.एम.मध्ये मायक्रोप्रोसेसरची चिप वापरलेली असते. ४) ई.व्ही.एम. यंत्रामध्ये कोणत्याही निवडणुकीतील एखाद्या ठरावीक जागेसाठी जास्तीत जास्त ६४पेक्षा अधिक उमेदवार नसतील, तेव्हा ई.व्ही.एम. यंत्राचा वापर योग्य ठरतो. जर उमेदवारांची संख्या ६४पेक्षा अधिक असेल त्या वेळी पारंपरिक मतपत्रिकांच्या आधारे मतदान घ्यावे लागते. ५) एका ई.व्ही.एम. यंत्रामध्ये जास्तीत जास्त ३८४० मतांची नोंद होऊ शकते.
महत्त्वाची माहिती- १) ई.व्ही.एम. यंत्रामध्ये पुन:पुन्हा बटन दाबले तरी मताची पुनरावृत्ती होऊन मत अवैध होत नसते. २) मतदानाच्या दिवशीर् ई.व्ही.एम.मध्ये काही दोष आढळला, तर अशी ई.व्ही.एम. यंत्रे क्षेत्र अधिकारी तात्काळ बदलून देतो. एका मिनिटाला ५पेक्षा अधिक मतांची नोंद ई.व्ही.एम.मध्ये करता येत नाही. एका तासात ३००पेक्षा अधिक मते नोंदविता येत नाहीत. ई.व्ही.एम. यंत्रामध्ये नियंत्रण एककातील बंद हे बटन दाबून निवडणूक अधिकारी ई.व्ही.एम.चे कार्य थांबवू शकतो.

यूपीएससी : जैवतंत्रज्ञान (भाग १)
जैवतंत्रज्ञान या विषयाची व्याप्ती व आवाका मोठा असल्याने जैवतंत्रज्ञानाची व्याख्या विविध प्रकारे करता येते. व्याख्या- जैवतंत्रज्ञान म्हणजे सूक्ष्म जीव, वनस्पती यांची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी, जीव-रसायनशास्त्र व सूक्ष्म जीवशास्त्र तसेच अभियांत्रिकीच्या संकल्पना यांचा एकत्रित वापर करणे. थोडक्यात जैवतंत्रज्ञान म्हणजे जैविक प्रणाली व पद्धतींचा उपयोग तांत्रिकरीत्या करून मानवास उपयुक्त असे विविध उत्पादन करणे.
जैवतंत्रज्ञानाच्या अंतर्गत पुढील बाबींचा समावेश होतो.
१) सूक्ष्म जीवांचा वापर करून घेणे. उदा. मळीपासून दारू तयार करणे, दुधापासून दही तयार करणे तसेच जिवाणूंचा वापर करून टाकाऊ पदार्थाची विल्हेवाट लावणे इ. २) डी.एन.ए., प्रथिने इ. जैविक रेणूंचा वापर मानवी फायद्यासाठी करणे. ३) विशिष्ट पेशीद्रव्ये, जीवनसत्त्वे, लसी इ.चे उत्पादन करणे. ४) जनुकीय बदल घडवून आणून हव्या त्या वनस्पती व प्राणी यांची निर्मिती/ हव्या त्या पदार्थाची निर्मिती करणे. उदा. जिवाणूंमध्ये जनुकीय बदल घडवून आणून त्यांचा वापर मानवी हार्मोन्स तयार करण्यासाठी करणे.
जैवतंत्रज्ञानाचे प्रकार दोन प्रकार
अ) अजनुकीय जैवतंत्रज्ञान- यात संपूर्ण पेशी, ऊती किंवा पूर्ण वैयक्तिक जीवाचा उपयोग केला जातो. उदा. वनस्पतीमधील ऊतीसंवर्धन संकरित बियाण्यांची निर्मिती. ब) जनुकीय जैवतंत्रज्ञान- यात पेशीतील जनुकांमध्ये बदल घडवून आणून किंवा एका सजीवातील जनुक दुसऱ्या  सजीवात टाकले जातात. याला जनुकीय अभियांत्रिकी (Genetic Engineering) असेदेखील म्हणतात.
जैवतंत्रज्ञान व भारत- जैवतंत्रज्ञान क्षेत्रात जगभरात प्रगती होत होती. भारतालाही या प्रगतीचा लाभ व्हावा तसेच देशात या नवीन तंत्रज्ञानाला चालना मिळावी म्हणून १९८२मध्ये भारत सरकारने राष्ट्रीय जैवतंत्रज्ञान मंडळाची स्थापना केली. या मंडळाने जैवतंत्रज्ञानासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी विशेष प्रयत्न केले. पुढे १९८६मध्ये या मंडळाचे रूपांतर विज्ञान व तंत्रज्ञान मंडळांतर्गत काम करणारा जैवतंत्रज्ञान विभाग (Genetically Modified -GM)) निर्माण केला.
जैवतंत्रज्ञानविषयक कार्यक्रमांचे नियोजन, त्यांमध्ये सुसूत्रीकरण करण्याची जबाबदारी या विभागाकडे आली.
जैवतंत्रज्ञान माहिती प्रणाली- जैवतंत्रज्ञानाच्या माहितीची देवाणघेवाण करणे, तिचा साठा करणे, यासाठी १९८७मध्ये जैवतंत्रज्ञान माहिती प्रणाली अस्तित्वात आली. जैवतंत्रज्ञानाचा उपयोग सर्वच शाखांमध्ये होऊ लागल्याने जैवतंत्रज्ञान या क्षेत्राच्या माहितीची गरज वाढली. नवीन तंत्राच्या साहाय्याने माहिती मिळविणे, ती संकलित करणे, ती साठविणे व जेव्हा गरज असेल तेव्हा या प्रणालीचा वापर करणे. यासाठी जैवतंत्रज्ञान माहिती प्रणाली उभी करण्यात आली. जैवतंत्रज्ञान माहिती प्रणाली तयार करणारा भारत हा जगातील पहिलाच देश आहे. या प्रणालीच्या माध्यमातून जैवतंत्रज्ञानाची माहिती अद्ययावत करणे यासाठी विशेष माहिती कोश करण्यात आला.
जैवतंत्रज्ञानाचे उपयोग
पीक तंत्रज्ञान-कृषी क्षेत्रामध्ये जैवतंत्रज्ञानाचा उपयोग पुढीलप्रमाणे१) संकरित बियाणे यात दोन वेगवेगळय़ा प्रकारे जिनोटाइप एकत्र करून विविध पिकांच्या किंवा फळांच्या जाती निर्माण करणे.
२) जनुकीयदृष्टय़ा उन्नत पिके (Genetically Modified -GM) उदा.बाहेरच्या जनुकाला एखाद्या पिकाच्या जनुकीय साठय़ामध्ये टाकून मिळविण्यात आलेल्या इच्छित पिकाच्या गुणधर्माला जनुकीयदृष्टय़ा उन्नत पिके असे म्हणतात. या प्रकारच्या तंत्रज्ञानामुळे पिकांच्या जास्त उत्पादन देणाऱ्या जाती, रोगप्रतिकार जाती, तणनाशक जाती तसेच दुष्काळात तग धरू शकणाऱ्या जाती निर्माण करता येतात. उदा. बी. टी. कॉटन, बी. टी. वांगे इ.
बी. टी. कॉटन- पारंपरिक व नसíगक कापसाच्या जातीला कीटकांपासून नुकसान होते. यापासून बचावासाठी रासायनिक कीटकनाशकांचा उपयोग करता येऊ शकतो, परंतु या रासायनिक कीटकनाशकांचा पर्यावरणावर हानिकारक परिणाम होतो. हे टाळण्यासाठी शास्त्रज्ञांनी जैवतंत्रज्ञानाचा वापर करून कापसाचे बी. टी. कापूस ही जात विकसित झाली आहे. यात बॅसिलस थुरिंजिनेसिस नावाच्या जिवाणूमधून एक विशिष्ट जनुक काढून ते कापसाच्या बियाण्यांमध्ये टाकले जाते. बॅसिलस थुरिंजिनेसिसमध्ये कापसावर पडणाऱ्या बोंडअळीविरुद्ध विषारी तत्त्व तयार करण्याची क्षमता आहे. हा विषारी पदार्थ म्हणजे एक प्रकारे प्रथिने  असते. ही प्रथिने बोंडअळीच्या पोटात गेल्यानंतर पचन संस्थेच्या कार्यात अडथळा येऊन बोंडअळी मरण पावते. मात्र विषारी प्रथिने मानवाला व इतर प्राण्यांना हानिकारक नसतात. अशा प्रकारे बी. टी. कापूस बोंडअळीपासून स्वत:चे संरक्षण करते व पिकांची हानी टळते. शास्त्रज्ञांनी अशाच प्रकारे बी. टी. वांग्याची जात तयार केली आहे. स्विस फेडरल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या शास्त्रज्ञांनी तांदळाच्या गोल्डन राइसची निर्मिती केली आहे. त्यामध्ये जीवनसत्त्व अ निर्माण करणारे जीन टाकले आहे.
जैविक खते- मातीत असणारे काही प्रकारचे सूक्ष्म जीव वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असतात. असे सूक्ष्म जीव पिकाला आवश्यक असणाऱ्या मूलद्रव्यांचा पुरवठा करतात. अशा प्रकारच्या सूक्ष्म जीवांचा जैविक खते म्हणून वापर करता येऊ शकतो. उदा. पिकाला नत्र (नायट्रोजन), स्फुरद (फॉस्फेट), गंधक (सल्फर) इ. मूलद्रव्यांचा पुरवठा करणारे सूक्ष्म जीव प्रयोगशाळेत वाढून त्यांचा वापर जमिनीत ज्याप्रमाणे कमतरता असेल त्याप्रमाणे करता येतो. उदा. नीलहरित शैवाल, ऱ्हायझोियम, अझोटोॉक्टर, अझोला इ.

in Yavatmal-Washim Constituency Uddhav Thackerays candidates will lose Due to the election symbol
‘धनुष्यबाण’ उद्धव ठाकरेंच्या उमेदवारासाठी ठरणार नुकसानदायी; यवतमाळ-वाशीम मतदारसंघात…
Loksabha Election 2024 Last 72 hours most crucial during elections
मतदानापूर्वीचे ३ दिवस का महत्त्वाचे असतात? काय असते प्रक्रिया?
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था – मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये
Letter from Amolakchand college professor to district election decision officer regarding ballot paper voting
‘ईव्हीएम’ऐवजी ‘बॅलेट पेपर’वर मतदान घेतल्यास निवडणूक ड्युटी करतो! प्राध्यापकाच्या व्हायरल पत्राची समाजमाध्यमांमध्ये चर्चा