हिंदु- मुस्लिमांमधील तणावाने तापलेल्या पश्चिम उत्तर प्रदेशात पोळी भाजण्याचा भाजपचा इरादा; ७३ जागांसाठी आज मतदान
वो तो गुंडा है जी. हिंदूंओ को मुसलमानों के खिलाफ भडका के जीत जाता है.. मेरठ उर्फ मीरत जिल्ह्यमधील सरढणा या छोटय़ाशा गावातील महंमद सादाब जोरजोरात बोलत होता. त्याच्यासोबत असणारा सुनीलकुमार गौतमचीही भाषा तशीच जहाल होती.
दातओठ खाऊन ते बोलत होते संगीत सोमविषयी. नाव आठवलं? सरढणाचा फायरब्रँड भाजप आमदार. स्वत:ला ‘हिंदू हृदयसम्राट’ आणि ‘महाठाकूर संघर्षवीर’ अशा पदव्या लावून घेणारा. आणि हो.. २०१३च्या कुप्रसिद्ध मुझफ्फरनगरच्या दंगलीतील आरोपी. चौकशी आयोगाने ठपका ठेवला; पण कारवाईची शिफारस न केल्याने उजळ माथ्याने फिरणारा. चौकशीतून कशीबशी सुटका झाल्यानंतरही सोम यांचा भडकाऊ पिंड बदलला नाही. कारण मतदारसंघातील गणितच विचित्र आहे. तीन लाखांपैकी सुमारे पावणे दोन लाख मते मुस्लिम आणि दलितांची. बसपाच्या उमेदवाराने ही मते घेतली तर सोम हारलेच म्हणून समजा. म्हणून तर ते जीव तोडून निवडणुकीला हिंदू-मुस्लिम वळण देण्यासाठी आटापिटा करीत आहेत. महंमद आणि सुनील या बसपा कार्यकर्त्यांंना त्याची जाणीव झालीय. ‘सोम यांनी स्वार्थासाठी सगळा सत्यानाश केला. त्यांनी गावाचे दोन तुकडे केलेत. मुस्लिम मोहल्लय़ात बिगरदलित हिंदू फिरकत नाहीत आणि तिकडे जायला मुस्लिमांना भीती वाटते,’ असे महंमद सांगत होता. तरीही सोम यांना धडा शिकविण्याची रग त्याच्या बोलण्यात होती.


पण पष्टिद्धr(१५५)म उत्तर प्रदेशात असे ‘सोम’ ठिकठिकाणी आहेत आणि त्यांनी सर्वपक्षीय मुखवटे चढविलेत. शेजारच्या श्यामली जिल्ह्यत थाना भवनमध्ये भाजपचे दुसरे आमदार आहेत. सुरेश राणा असे त्यांचे नाव. डिट्टो सोम यांच्यासारखेच. जिंकलो तर (मुस्लिमबहुल) कैराना, देवबंद, मोरादाबादमध्ये संचारबंदी लावण्याची उघडउघड भाषण करणारे राणा हे सोम यांच्याप्रमाणेच भाजपच्या कडव्या कार्यकर्त्यांचे ‘आयकॉन’. पष्टिद्धr(१५५)म उत्तर प्रदेशात हिंदू-मुस्लिमांमध्ये काही खुट्ट झाले, की हे दोघेही तिथे हजर असतात. त्यांचा शाब्दिक उन्माद हिंदूंना चेतवितो आणि इतरांना प्रतिRिया देण्यास भाग पाडतो. आज (शनिवार, दि. ११) हाच कमालीचा संवेदनशील टापू मतदानाला सामोरे जातो आहे. श्यामली, मुझफ्फरनगर, बागपत, मेरठ, बुलंदशहर, अलीगड, फिरोजाबाद, एटा, आग्रा आदी पंधरा जिल्ह्यतील ७३ मतदारसंघांचा कौल उत्तर प्रदेशासाठी अत्यंत महत्वपूर्ण असेल.
पष्टिद्धr(१५५)म उत्तर प्रदेशमधील वैशिष्टय़पूर्ण धार्मिक स्थितीमुळे सर्वांचे आजच्या पहिल्या टप्प्याकडे लक्ष आहे. पण या टापूला जातीय तणाव नवा नाही. कारण हा इलाका आहे मुस्लिमबहुल. उत्तर प्रदेशात मुस्लिमांचे एकूण प्रमाण १७ टक्के आहे; पण इथे ते २७ टक्के जाते. म्हणजे ‘जाटलँड’ म्हणून ओळखला जात असला तरी या जाटबहुल इलाक्यात बोलबाला मुस्लिमांचा. रामपूरसारखा जिल्हा तर आताच मुस्लिमबहुल (५१ टक्के) आहे आणि मोरादाबाद, बिजनोर, मुझफ्फरनगरसारखे जिल्हे तो कित्ता गिरविण्याच्या मार्गावर आहेत. काही विधानसभा मतदारसंघात तर मुस्लिमांचे प्रमाणे थेट सत्तर टक्कय़ांच्या आसपास आहे. मुस्लिमांचे हे संख्यात्मक वर्चस्व हिंदूंना डाचते. त्यांच्या मनात निपजलेल्या याच भीतीचा भाजप नेमकेपणाने फायदा उचलत आहे. परिणामी संपूर्ण निवडणूक धार्मिक ध्रुवीकरणाभोवती फिरत आहे. २००२च्या गुजरात दंगलीनंतर गुजरात ‘हिंदुत्वाची प्रयोगशाळा’ बनली होती; त्याप्रमाणे २०१३च्या मुझफ्फरनगर दंगलीनंत हा टापू जणू काही धार्मिक ‘ध्रुवीकरणाची फॅक्टरी’च झाली आहे. त्यात योगी आदित्यनाथांसारखा ‘प्रॉडॅक्शन मॅनेजर’ असेल तर मग बोलायलाच नको. मुस्लिमांच्या मतांसाठी भाजपच्या मशागतीला समाजवादी व बसपा तितकेच खतपाणी घालतोय.
आठवा दोन- तीन वर्षे. उत्तर प्रदेश म्हटले की मुझफ्फरनगर, दादरी (बिसहाडा) आणि कैराना आठवते. मुस्लिमांच्या दहशतवादाने कैरानातील हिंदूंनी पलायन केल्याचा सनसनाटी दावा करून भाजपचे कैरानाचे खासदार हुकुमसिंह यांनी खळबळ उडविली. त्यात फारसे तथ्यम् नसल्याचे पुढे सिद्ध झाले. याच कैरानावरून हिंदुत्ववाद्यंनी आग्यामोहोळ पेटविला असला तरी मुस्लिमांना संशयाच्या पिंजरयात उभे करणारे हुकुमसिंह उर्फ बाबूजी हे कैरानातील मुस्लिमांमध्येच बरेच लोकप्रिय आहेत.
‘जाये तो जाये कहाँ..’
समाजवादी- काँग्रेस यांच्या आघाडीकडे मुस्लिम मते जाण्याचा सर्वसाधारण व्होरा आहे. पण या पष्टिद्धr(१५५)म उत्तर प्रदेशातील मुस्लिम चांगलेच कोंडीत सापडलेत. त्यांचा नैसर्गिक ओढा समाजवादी पक्षाकडे; पण या टापूतील अनेक मतदारसंघात भाजपला हरविण्याची ताकत फक्त बसपाच्या उमेदवारांकडे. यातून मुस्लिम मतांची फाटाफूट होणार असल्याचे उघड दिसतेय. याबाबत छेडले असता भूनी या सरढणाजवळील छोटय़ा गावात पंरचे काम करणारी एक मुस्लिम व्यक्ती म्हणाली,’मुस्लिम मते विभागली जातीलच. त्याचा फायदा भाजपला होईल. पण करणार तरी काय?’ मुस्लिमांची हीच असहायता नेमक्यापणाने हेरून मायावतींनी पहिल्या टप्प्यात ७३पैकी २२ जागा मुस्लिमांना दिल्यात. याउलट समाजवादी पक्षाने १२ मुस्लिमांना संधी दिलीय. विभागणारया मुस्लिमांमुळे ध्रुवीकरणाची मशागत केलेल्या भाजपच्या कापणीला भरघोस पीक येण्याची दाट चिन्हे आहेत.