‘कोवळ्या वयाची दारू(ण) अवस्था’ (४ फेब्रुवारी) हा लेख आवडला. त्या अनुषंगाने मला काय वाटते ते लिहितो. कोणतीही सामाजिक सुधारणा कायद्याने होत नसते. काळ जस जसा बदलत गेला आहे तसतशी लोकांची भीड चेपत गेली आहे. पूर्वी हे ‘प्राशन’ गुपचूप व्हायचे. आता उघड पाटर्य़ा होतात. अतिताण किंवा अतिकष्ट पडले की पूर्वी सुपारी, चहा, देवळात जाणे, कीर्तन ऐकणे वगरे उपाय होते. नंतर सिगरेट, दारूच्या कुबडय़ा आल्या. ‘चालायचेच’ अशी वृत्ती बोकाळली. तुम्ही अट्टल दारुडे होणार की उगीच कधीमधी एखादा घोट घेणारे होणार, हे प्यायल्याशिवाय कळत नसते. दारुडय़ाचे दारूवर प्रेम असते. मजूर हातभट्टीची पिऊन बायकोला मारहाण करत शेवटी मरतात आणि श्रीमंत विलायती दारू पिऊन लिव्हर खराब होऊन मरतात. हल्ली उघड पिणे सुरू झाले आहे. स्त्रियाही सोशल िड्रकर झाल्या आहेत. अल्पवयीन मुलींना बाटल्या विकत आणायला पाठवणारे वडील मी पाहिले आहेत. हे सारे सहन करणाऱ्या ‘सिंधू’ अजूनही मुकाटपणाने घरची अब्रू सांभाळत आहेत. अल्कोहोल हे अजब रसायन आहे, ते डाग काढू शकते, घरातील फíनचर विक्रीला काढू शकते. संसार उद्ध्वस्त करू शकते, कुटुंबातील मुलांचे आयुष्य खराब करू शकते. अल्कोहोल हे उत्तेजक नसून नराश्य आणणारे पेय आहे. पाश्चात्त्य देशांनी त्याला राजमान्यता दिली आहे. न पिणारा हा एक समाजातील मूर्ख आणि मागास माणूस असतो. पुरुषच पीअक्कड असतो असे नाही, बायकाही पिऊ लागल्या आहेत. कायद्याने हे थांबणार नाही. संस्काराचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. आपण पाश्चात्यांकडून नको ते घेतले आहे हे खरेच! दारू पिऊन झालेल्या वाहतूक अपघातांबद्दल भीती वाटते. दारू पाजून बलात्काराच्या घटना वाढत आहेत. दारू इथे निर्माण होणे थांबणार नाही. स्त्रियांसाठी आकर्षक आकाराच्या बाटल्या निर्माण होत आहेत. त्यांची संख्या वाढायचे टाग्रेट ठरवले जात आहे. काळ मोठा कठीण आला हेच खरे!

– यशवंत भागवत, पुणे</strong>

daughters become guests in their own father house after marriage
नातेसंबंध : माहेर उपरं करतं?
Shani Maharaj To Walk 360 Degree U Turn Next 139 days These Three Rashi To Earn More Money
१३९ दिवस शनी उलट चालत ‘या’ राशींच्या कुंडलीला देणार ३६० अंशात कलाटणी; प्रचंड श्रीमंती देणार शनैश्वर महाराज
second wife of an invalid marriage may not complain of harassment but of dowry
अवैध लग्नाची दुसरी पत्नी छ्ळाची नाही, पण हुंड्याची तक्रार करू शकते
The price of gold reached the highest level
विश्लेषण: सोन्याला तेजीची झळाळी का?

 

दारूबंदी हवीच

दारूच्या व्यसनापायी अनेक बहुमोल जीव अकारण वाया गेलेत. देशाची खरी संपत्ती ही त्याचे नागरिक आहेत हे जेव्हा सरकार व जनतेला कळेल तेव्हा त्याचे मोल जाणवेल. आपले नागरिक जर बहुमोल हवेत तर ते निव्र्यसनी असायला हवेत. दारूचे व्यसन ती सहज मिळते म्हणून लागू शकते. तिच्या निर्मितीलाच जर देशभर बंदी घातली तर? केवळ प्रचंड अबकारी कर मिळतो या मोहापायी जर सरकार जर दारूबंदी करत नसेल तर ते खरोखरच दुर्दैवी म्हणावे लागेल. याचा अर्थ सरकारला निव्र्यसनी जनतेपेक्षा पसा जास्त महत्त्वाचा वाटतो. संपूर्ण देशात जर दारूनिर्मिती बंद केली तर आजच्या समाजातील ही दारुडी अवस्थाच राहणार नाही, याचा गंभीरपणे विचार व्हावा.

– डॉ. शिवाजी  गायकवाड, राजगुरूनगर

 

कोणतंही मूल स्वतंत्र व्यक्तिमत्त्वच

‘पालकत्वाचे नवे क्षितिज’ या सदरातील ‘समृद्ध प्रवास’द्वारे संगीता बनगीनवार यांचे विचार वाचायला मिळाले. दत्तक मूल असणे स्वत: त्या मुलासाठी आणि पालकांसाठी ‘भावनिक’ आव्हान असते, हे खरे आहे पण मला इथे एक विचार असा मांडायचा आहे की खरे तर प्रत्येक मूल हे वेगळे स्वतंत्र सामाजिक अस्तित्व घेऊन जन्माला आलेले असते. ही गोष्ट आपण पक्की लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या स्वत:च्या मुलांवरसुद्धा आपण नको तितका अधिकार गाजवू नये. ते मूल मग मुलगा असो वा मुलगी स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे आणि आपण फक्त त्यांना या जगात माध्यम म्हणून आणलेले आहे हे माहिती असणं कधीही बरं. जनुकीय रचना आणि त्यानुसार येणारे नातेसंबंध यांचे ज्ञान सर्वच मुलांना समजून सांगणे व त्याद्वारे त्यांना ‘माणूस’म्हणून घडवायला पालकांनी मनापासून प्रयत्न करायला हवेत. काही प्रगत पाश्चात्त्य देश आपल्या मुलांना असे संस्कार देतात.  बाकी दत्तक किंवा स्वत:च मूल यात बाहेरून दिसण्यात आणि आपल्या ‘मना’तला फरक सोडला तर वेगळं काही नाही ..!! आणि ‘हे विज्ञान’ त्या दत्तक व्यक्तीलाही समजावले गेले पाहिजे आणि हा भावनिक कल्लोळ थांबवला पाहिजे.

– डॉ . सविता पंडित

 

लेख भावले, आवडले

‘वार्धक्यरंग’ सदरामधील भा.ल.महाबळ यांचा ‘मोठी आई’ हा लेख नेहमीप्रमाणे मजेशीर होता. ‘बोधिवृक्ष’मधील जे कृष्णमूर्ती यांच्या ‘द्वेष’ या लेखातील ‘कोणताही आधार नसताना असुरक्षित राहणे यांचे महत्त्व कळत नाही, पण जेव्हा तुम्ही पूर्ण निराधार व असुरक्षित असता तेव्हाच तुम्हाला नवीन शोध लागू शकतो.’ हे वाक्य आवडून गेलं.

४ फेब्रुवारीमधील ‘पालकत्वाचं नवं क्षितिज’मधील संगीता बनगीनवार यांचा समृद्ध प्रवासमधील संगीताला तिचा जोडीदार आकाशने इतके समजून घेतले हे खरोखरच प्रशंसनीय आहे. खरंच आपण सगळ्यांनी याचा सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करायला हवा. चतन्य प्रेम यांच्या ‘विचारपारंब्या’मधील सदगुरूंच्या चरणी आपण स्वत:ला पूर्ण समíपत केलंय, असं आपण तोंडाने म्हणतो, पण आता हे जीवन तुमचं आहे याचं तुम्ही काहीही करा..मला काय त्याचं? हा खरा निíलप्त भाव आपल्यात कणभर तरी असतो का हो ? हे पटलं. ‘मन विकार विचार’मधील डॉ.नंदू मुलमुले यांचा ‘ठणका’ लेख भावला. प्रणव सखदेव यांच्या त्याच्या नजरेतून ‘ती’या मधील ‘डीअर आलिया’ ही कथा काळजाला चटका लावणारी होती. एकंदर शनिवारचा चतुरंग एकदम सुंदरच, भारी, उत्तम !!!

– भारती धुरी