संत सोपानकाकांच्या नगरीत विसावला

‘ज्ञानोबा माऊली.. तुकाराम..’असा जयघोष करीत अवघड दिवेघाट पार करुन मंगळवारी रात्री आठ वाजता संत सोपानकाकांच्या सासवड नगरीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचे आगमन झाले.

pune leopard marathi news, shirur leopard marathi news
कोंबड्यांच्या खुराड्यात बिबट्याची मादी कैद
Caste end thought of Babasaheb Ambedkar and Mahatma Jyotiba Phule
फुले-आंबेडकरांचा जाती-अंत विचार
latur lok sabha marathi news, shivraj patil chakurkar latur latest news in marathi
शिवराज पाटील यांच्या ‘देवघरा’ बाहेरील गर्दी वाढली
wardha lok sabha seat, devendra fadnavis, not attend, campaign rally , discussion started, bjp, less crowd, sharad pawar, rally, marathi news, maharashtra politics,
शरद पवारांच्या तुलनेत देवेंद्र फडणवीस यांच्या फसलेल्या रॅलीची गावभर चर्चा; मात्र, भाजपा नेते म्हणतात…

आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. अजित कुलकर्णी यांच्या हस्ते पहाटे माउलींची नित्यपूजा व आरती झाल्यानंतर सकाळी सहा वाजता माउलींचा पालखी सोहळा सासवडकडे मार्गस्थ झाला. पुणे ते सासवड हा सुमारे तीस किलोमीटरचा टप्पा मोठा असल्याने पालखी सोहळा वेगात पुढे चालत होता. सकाळी नऊ वाजता हडपसर येथे पालखी सोहळा पोहोचला. हजारो भाविकांनी तेथे दर्शनासाठी गर्दी केली होती. एकादशी असल्याने ठिकठिकाणी वारकऱ्यांना फराळाचे पदार्थ वाटले जात होते. पुणे ते दिवे घाटापर्यंत पालखी सोहळ्यात मोठय़ा संख्येने पुणेकर सहभागी झाले होते. त्यात युवक-युवतींचीही संख्या मोठी होती. माउलींचा पालखी सोहळा दुपारी अडीच वाजता वडकीनाला येथे पोहोचला. तेथे वारकऱ्यांनी दुपारचा फराळ व विश्रांती घेतली. विश्रांतीनंतर दुपारी साडेतीन वाजता पालखी सोहळ्याने अवघड दिवे घाट चढण्यास सुरुवात केली.

वैष्णवां संगती सुख वाटे जीवा

आणिक मी देवा काही नेणी

गाये नाचे उडे आपुलिया छंदे

मनाच्या आनंदे आवडीने..

अशा भावनेने वारकरी जात होते.

दिवे घाटामध्ये कडक ऊन जाणवत होते. दिवसभरात पावसाचा थेंबही पडला नाही. त्यामुळे वारकरी घामाघूम झाले होते. तरीही विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरीला निघालेला वैष्णवांचा मेळा न थकता अवघड दिवे घाट पार करीत होता. अनेक िदडय़ांमध्ये टाळ-मृदंगाच्या तालावर निरनिराळे अभंग व गीते गायली जात होती. त्यामुळे साऱ्यांचाच उत्साह द्विगुणित होत होता. अशा भक्तिरसात न्हाऊन गेलेल्या वातावरणात पालखी सोहळ्यातील लाखो वारकऱ्यांनी दिवेघाट सहजगत्या पार केला. घाटात डोंगरावरील दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी डोंगरावर बसण्यास भाविकांना मनाई केली होती. तरीही डोंगरमाथ्यावर हजारो भाविक पालखी सोहळा पाहण्यासाठी बसले होते. सायंकाळी पाच वाजता पालखी सोहळा दिवे घाट चढून वर आला. जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी मंत्री दादा जाधवराव, चंदुकाका जगताप, विजय कोलते, पुरंदर पंचायत समितीचे सभापती अतुल म्हस्के, पुरंदरचे प्रांत संजय असवले, तहसीलदार सचिन गिरी, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भरते, गटविकास अधिकारी डॉ. संजय काळे यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले.

रथात तांत्रिक बिघाड

सासवड मार्गावरील काळेवाडी, दिवे हे टप्पे पार करीत पालखी सोहळा रथ पवारवाडीच्या पुढे चंदन टेकडीजवळ आला असता पालखीच्या रथात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे थोडासा गोंधळ उडाला. मात्र या वेळी सासवड परिसरातील भाविकांनी पालखी खांद्यावर घेऊन दोन किलोमीटरचा टप्पा पार केला.

सासवड हद्दीत पालखीचा प्रवेश होताच नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्ष मरतड भोंडे, उपाध्यक्ष विजय वढणे, मुख्याधिकारी विनोद जळक व संत सोपानकाका सहकारी बँकेचे अध्यक्ष वतीने संजय जगताप यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत करुन िदडी प्रमुख व वीणेकऱ्यांचा सत्कार केला. रात्री सव्वाआठ वाजता पालखी तळावर समाज आरती झाली. दोन दिवस संत सोपान देवांच्या सासवड नगरीत मुक्काम करुन पालखी सोहळा खंडेरायाच्या जेजुरी नगरीकडे गुरुवारी मार्गस्थ होणार आहे.