manoj-avnakrआजच्या काळात घराच्या सौंदर्यात भर टाकणारी घरातली आणखी एक जागा म्हणजे टॉयलेट ब्लॉक! घरातलं टॉयलेट किती नीटनेटकं, स्वच्छ आणि दिसायला पॉश आहे, त्यावरून घरी येणारे पाहुणे हे घराच्या मालकाच्या सांपत्तिक स्थितीचा अंदाज बांधत असतात. खरं तर, स्वच्छता ही काही पर्यायी बाब असू शकत नाही. ती एक अत्यावश्यक बाब आहे, हे आपल्या संस्कृतीत फार पूर्वीपासूनच सांगितलं गेलंय. ‘देह देवाचे मंदिर’असं एका गाण्यात जे म्हटलंय ते खरंच आहे. ज्या देहात चतन्य म्हणजेच देवाचा वास असतो असं आपण मानतो, त्या देवाच्या मंदिराची उपमा दिलेल्या देहाची स्वच्छता राखण्याकरता असलेली जागा, ही स्वच्छ आणि प्रसन्नच असायला हवी. अशा या टॉयलेट ब्लॉकचे मुख्यत: तीन भाग सांगता येतात ते म्हणजे- बाथरूम, शौचालय आणि बेसिनची जागा.
तुमच्या घरातल्या टॉयलेट ब्लॉकचं नूतनीकरण करताना सर्वात महत्त्वाचा भाग असतो तो प्लंिबगचा! कारण िभतीआड दडलेल्या कन्सिल्ड प्लंिबगमधले जे पाइप असतात, त्यांच्या सांध्यातून केवळ एकेक थेंब पाणी जरी गळत राहिलं, तर तुमची स्वत:च्या घरातल्या, शेजाऱ्यांच्या घरातल्या किंवा तुमच्या खालच्या घरातल्या िभतींवर किंवा स्लॅबमधून पाण्याचा पाझर अथवा गळती सुरू होऊ शकते. अशाप्रकारे जर बराच काळपर्यंत ही गळती सुरू राहिली तर बीम, कॉलम किंवा स्लॅबमधल्या लोखंडी सळ्या गंजायला सुरू होऊन इमारतीच्या अस्तित्वालाच धोका उद्भवू शकतो. शिवाय गळतीच्या बाबतीतला आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे ती नेमकी कुठून होते आहे, ते शोधून काढणं सर्वात कठीण असतं. कारण पाणी ज्या िभतीतून किंवा ज्या स्लॅबमधून गळत असेल, त्याच्या मागच्या बाजूलाच किंवा त्या स्लॅबच्या वरतीच त्या गळतीचा स्रोत असेल, असं सांगता येत नाही. पाण्याला बीम, कठलम, स्लॅब किंवा िभतीमधून जिथे वाहण्यासाठी छिद्रं किंवा रस्ता उपलब्ध असेल, तिथून ते वाहतं. म्हणून टॉयलेट ब्लॉकचं काम करून घेताना योग्य प्रकारे वॉटरप्रूिफग करून गळती होणारच नाही, याची काळजी घेणं, तसंच पाईप जोडले जातात, त्या सांध्यांमध्ये थोडय़ाही फटी असणार नाहीत याची काळजी घेण्याकरता ते पाइप घट्ट जोडून घेणं आवश्यक असतं. थोडीही दिरंगाई, दुर्लक्ष अथवा आळशीपणा हा खूप महागात पडू शकतो.
टॉयलेटच्या आणि विशेषत: बाथरूमच्या काँक्रीटच्या स्लॅबच्या वरच्या भागावर असलेल्या लाद्या, त्याखाली असलेला वॉटरप्रूिफगचा जुना थर काढून टाकावा. तो काढताना स्लॅबला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी. हे दोन्ही थर पूर्णपणे काढून टाकून स्लॅबचा वरचा पृष्ठभाग मोकळा करून घ्यावा व त्यावर लॅटेक्स मेंब्रेन म्हणजे रबरासारख्या पदार्थाचा थर असलेली एकप्रकारची चटई असते ती अंथरूण घ्यावी. त्यावर पाणी वाहून जाण्याकरता एका बाजूला विटांचा अधिक उंचीचा थर तर दुसऱ्या बाजूला कमी उंचीचा विटांचा थर घालून त्यावर सिमेंटचा कोबा घालून घ्यावा. हा विटा आणि सिमेंटचा कोबा तयार करत असताना त्यात वॉटरप्रूिफग करणारा द्रव किंवा पावडर विशिष्ट प्रमाणात मिसळली जाते. यामुळे हा जाड थर सुकून घट्ट झाला की, त्यावर शेतात असतात तसे सिमेंटचे वाफे तयार करून त्यात पाणी भरून ठेवलं जातं. हे पाणी भरून स्लॅबमधून खाली गळती होत नसल्याचं सिद्ध झालं की, मग पुढलं काम केलं जातं. त्यासाठी भरून ठेवलेल्या पाण्याची पातळी तेवढीच आहे की, कमी होते आहे, ते आज पाहिलं जातं. पातळी कमी होत असेल, तर त्याचा अर्थ पाणी कुठेतरी खाली झिरपतंय. तसं होत असेल, तर या मिश्रणाचा आणखी एक थर त्यावर द्यावा लागेल. या वॉटरप्रूिफगसाठी वापरली जाणारी रसायनं द्रव स्वरूपात असतील तर दीडशे ते दोनशे रुपयांना एक लिटरची रसायनाची बाटली मिळते. पावडर स्वरूपात असेल, तर साधारण अर्धा किलोच्या पावडरच्या पाकिटाला ३५ ते चाळीस रुपये पडतात. सिमेंट आणि रेतीचा भाव त्या त्या वेळेनुसार कमी-अधिक होत असतो. बाजारात उपलब्ध असलेली रेती दोन प्रकारची असते. गुजरात प्रकारची रेती ही चांगल्या दर्जाची समजली जाते. इतर प्रकारच्या रेतीत गाळाचं प्रमाण अधिक असल्यामुळे अशी रेती वापरणं अयोग्य आहे.
कारण त्यापासून तयार केलेल्या रेती-सिमेंटच्या मिश्रणाला सुकल्यावर तडे जातात. त्यामुळे त्यातून गळती सुरू व्हायची शक्यता असते, म्हणून गाळ अधिक असलेली नदीची रेती शक्यतो टाळावी. या वॉटरप्रूिफगच्या थरावर मग रेती-सिमेंटचं मिश्रण असलेला मॉर्टरचा थर घालावा. आकृती (१) पाहा. बाथरूममधलं सांडपाणी वाहून नेण्याकरता तसंच सांडपाण्याच्या पाइपातली दरुगधी घरात येऊ नये याकरता बाथरूमच्या एका कोपऱ्यात बसवलेल्या जाळी खाली न्हाणी ट्रॅप असतो [छायाचित्र (१)]. यात सतत पाण्याची पातळी एकसमान ठेवली जाते. या पाण्यामुळे बाहेरच्या पाइपातली दरुगधीही घरात येत नाही. पण जाळीखाली असलेल्या या न्हाणी ट्रॅपच्या पाइपाच्या आजूबाजूने जर सिमेंटने सांधा भरलेला नसेल, तर अशा फटीतून बहुतेक वेळा खालच्या सदनिकेत गळती सुरू होते. तसंच, बाथरूमच्या िभतीवरच्या किंवा फ्लोअिरगच्या लाद्यामध्ये जर भेगा गेल्या असतील, तर त्यातूनही गळती व्हायची शक्यता असते. त्यामुळे बाथरूममधलं टायिलग करताना दोन लाद्यांमधले सांधे व्यवस्थित आणि पूर्णपणे भरायला हवेत. तसंच लाद्यांखालच्या सिमेंटच्या कोब्यात जर भेगा किंवा तडे गेले असतील, तर त्यातूनही गळतीची शक्यता असते. तसेच टॉयलेटमध्येही इंडियन किंवा पाश्चिमात्य पद्धतीचे फ्लोअिरगवरील किंवा िभतीवरील शौचालयाचे भांडे [छायाचित्र (२)] बसवताना त्याखाली असलेल्या ट्रॅपमधूनही गळतीची शक्यता असते. त्यामुळे जिथे जिथे सांधे आहेत अशा ठिकाणी सर्व सांधे सिमेंटने नीट िलपून बंद करणं गरजेचं असतं. बेसिनखाली बॉटल ट्रॅप बसवला जातो. यातूनही गळती होऊन बेसिनमागची िभत ओली होण्याची शक्यता असते. त्यामुळे बेसिनच्या जाळीखाली हा ट्रॅप घट्ट बसवणं गरजेचं असतं. तसंच बेसिनवर जिथे नळ बसवला जातो, त्या सांध्यातूनही गळतीची शक्यता असते.
पाणी हे इमारतीचा कॅन्सर आहे. त्यामुळे इमारतीत कुठेही पाण्याचा पाझर किंवा गळती होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. पण ९० टक्क्यांहून अधिक गळती ही टॉयलेट ब्लॉकमधून होत असते. त्यामुळे या गळतीमुळे आपल्याला किंवा आपल्या शेजाऱ्यांना होणारा त्रास आणि त्यातून नंतरची होणारी डोकेदुखी जर टाळायची असेल, तर पाईपांमधले, बेसिनचे, बाथरूममधले किंवा टॉयलेटमधले सर्व प्रकारचे सांधे सिमेंटने काळजीपूर्वक भरणं आवश्यक आहे, तसंच शास्त्रोक्त पद्धतीने वॉटरप्रूिफग करून घेणं आवश्यक आहे. ते जर केलं, तरच त्या टॉयलेट ब्लॉकचं सौंदर्य खुलून दिसेल.
सिव्हिल इंजिनीअर
anaokarm@yahoo.co.in

cat
दुबईमध्ये पुराच्या पाण्यात बुडणाऱ्या मांजरीची जीव वाचवण्यासाठी धडपड! कारच्या दरवाजाला लटकणाऱ्या मांजरीचा थरारक Video Viral
mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ
How to soften your face with Malai Dry Skin Care
Skin Care: दुधाची २ चमचे साय घ्या आणि उन्हाने काळवंडलेल्या-निस्तेज चेहऱ्यावर करा जादू
tiffin box recipe chavli masala in marathi
Lunch box recipe : ‘चवळी मसाला’ सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी; कशी बनवावी पाहा