दिवाळीमध्ये लक्ष्मी आणि गणेश पूजनाला विशेष महत्त्व असते. घरोघरी उत्साहाने साजऱ्या होणाऱ्या या पूजेसाठी जो तो आपापल्या परीने जय्यत तयारी करीत असतो. यंदा थोडीशी कल्पकता वापरून आपली पूजेची थाळी सजवा नि परिपूर्ण पूजेचे समाधान मिळवा.

दिवाळीचा सण म्हटला की, उत्साह आणि हौशी-मौजीला अगदी उधाण आलेलं असतं. या निमित्ताने पारंपरिक गोष्टींना नावीन्यपूर्णतेची जोड देऊन त्याच थोडय़ा आकर्षक स्वरूपात सादर करण्याचा ट्रेण्ड अलीकडच्या काळात दिसून येत आहे.
अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर रांगोळी. पूर्वी ठिपक्यांची रांगोळी किंवा रांगोळीच्या पुस्तकातील नक्षीचा आधार घेऊन रांगोळी काढली जात असे. परंतु गेल्या काही वर्षांत यात लक्षणीय बदल घडून आला आहे. संस्कार भारतीच्या रांगोळीपासून ते कमीतकमी वेळेत काढता येणारी रांगोळी, इतकेच काय तर आजकाल रेडिमेड तयार काढलेली रांगोळीदेखील उपलब्ध आहे.
असाच बदल आता पूजेच्या थाळीतदेखील दिसून येत आहे. पूजेची थाळी म्हटलं की, ताम्हण, निरांजन, फुले-अक्षता, कुंकवाची कुइरी या गोष्टी येतात. पण गेल्या काही वर्षांत या थाळीला कॉर्पोरेट लुक येऊ लागला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरूनये.
ही थाळी सजविण्यासाठी गरज असते ती तुमच्या कलात्मक आणि निर्मितीशील अशा कल्पकतेची. या संदर्भात हौशी कलाकार म्हणून कार्यरत असणारी कृपाली वैद्य म्हणते की, आजकाल सणावारांच्या निमित्ताने आपल्याला प्रत्येक गोष्टीची सजावट खास आणि आकर्षक हवी असते. जेणेकरून समोरील सजावट पाहून मनास समाधान लाभते.
अलीकडे या थाळीमध्ये बीडस्, मोती, कुंदन, मणी, चकाकणाऱ्या टिकल्या, सोनेरी किंवा चंदेरी झालरी अशा तऱ्हेतऱ्हेच्या गोष्टींचा वापर केला जातो. त्याचबरोबर घरात उपलब्ध असलेल्या गोष्टी जसे, फुलांच्या पाकळ्या, धान्य, रांगोळी यांसारख्या गोष्टींचा वापर करूनदेखील सुबक थाळी सजविता येते.
यासाठी सहज करता येण्याजोगी कृती सांगताना ती म्हणते की, थाळीसाठी गोल, चौकोनी अथवा वेगळ्या आकारातील ताटाचा वापर करावा. या ताटावर तेल किंवा तूप पसरवून लावावे, म्हणजे व्यवस्थित बेसकोट तयार होईल. त्यावर कुंकू किंवा आवडीच्या रंगातील रांगोळी पसरवायची. लगेच थाळी उपडी करून जास्त झालेली रांगोळी अथवा कुंकू काढून टाकायचे. मूळ रंगांनुसार रंगसंगती साधावी. जसे मूळ रंग लाल असेल तर पांढऱ्या रांगोळीचा वापर करून मध्यभागी स्वस्तिक, ॐ किंवा कोणत्याही प्रकारची नक्षी काढावी. उरलेल्या मोकळ्या जागेत आवडीचे रंग भरल्यास थाळी अधिक उठावपूर्ण दिसते.
रंगीत पाकळ्या थाळीमध्ये पसरवून मध्यभागी धान्यांनी किंवा काजू बदाम यांसारख्या सुक्या मेव्याचा वापर करून मध्यभागी स्वस्तिक, ॐ किंवा गणपती काढता येऊ शकेल.
तांदूळ रंगवून घ्यावे. या रंगीत तांदळाच्या आधाराने थाळीत मध्यभागी पणतीची बॉर्डर लाइन काढावी नि मधल्या मोकळ्या जागेत पाकळ्या किंवा रंगीत रांगोळीच्या साहाय्याने सजावट करावी.
ताटाला चंदेरी किंवा सोनेरी कागद चिकटवावा. कागदाला शोभेल अशी झालर लावावी. थाळीमध्ये मोती, बीडस्, कुंदन किंवा कृत्रिम फुले- पाने यांच्या साहाय्याने सजावट करूनदेखील थाळी उत्तम सजविता येते.
घरी बनविलेल्या फराळाचा नेवैद्य प्रथम देवाला दाखवून मग तो खाण्यास सुरुवात करतात. अशा वेळी या फराळाच्या साहाय्यानेदेखील थाळीची सजावट करता येते. जसे शंकरपाळ्यांच्या साहय्याने मध्यभागी फूल, सभोवताली चिवडा पसरवून मध्येमध्ये चकली अथवा फराळातील इतर पदार्थाचा वापर करता येऊ शकतो. यातून थाळीची सजावट आणि नेवैद्य दाखविणे अशा दोन्ही गोष्टी साधता येतात. यावरूनच तुमच्या लक्षात आले असेल की, थाळी सजावट करणं सहज शक्य आहे. त्यासाठी बाजारातील महागडय़ा गोष्टींची गरज आहे असे नाही. तर घरात सहजपणे उपलब्ध असणाऱ्या गोष्टी वापरून सुबक नि आकर्षक सजावट शक्य आहे. गरज आहे ती फक्त आवडीची नि थोडय़ाशा कल्पकतेची. तेव्हा स्वत:ची कल्पकता वापरा नि थाळी सजावट करून दिवाळीचा आनंद आणखी द्विगुणित करा.
suchup@gmail.com

ram navami 2024 date tithi and shubh muhurat know significance of the birth anniversary of lord shri ram
Ram Navami 2024 : रामनवमीच्या दिवशी पूजेसाठी २तास ३३ मिनिटांचा शुभ मुहूर्त; जाणून घ्या तिथी, मुहूर्त वेळ व पूजा विधी
hanuman jayanti 2024 date time shubh muhurat puja mantra and signification
Hanuman Jayanti 2024: २३ की २४ एप्रिल, यंदा हनुमान जयंती कधी आहे? जाणून घ्या योग्य तिथी, पूजेचा मुहूर्त, मंत्र आणि महत्त्व
Mukh Darshan Arranged for Devotees on Gudhi Padwa at Pandharpur Temple due to Conservation Work
मराठी नववर्ष आणि गुढीपाडवा दिवशी विठ्ठलाचे मुख दर्शन दिवसभर : औसेकर महाराज
gudi padwa 2024 gudi padwa wishes date shubh muhurat rituals puja vidhi and more
Gudi Padwa 2024 : जाणून घ्या गुढी उभारण्यासाठी शुभ मुहूर्त, तिथी आणि महत्व