आपल्या सगळ्यांनाच नेहमी व्यवस्थित, नीटनेटके आणि सुंदर पद्धतीने ठेवलेले घर आवडते. मात्र, आपली धावपळीची जीवनशैली लक्षात घेता, हे खरेच शक्य आहे का? आधीच घर आणि ऑफिस अशी तारेवरची कसरत करताना गृहिणींची पुरती दमछाक होत असते. त्यामुळे नियमित घराची साफसफाई करणे शक्य नसते. मात्र, सणांचे दिवस जवळ आले की घराच्या साफसफाईला पर्याय नसतो. सगळा कंटाळा आणि थकवा बाजूला सारून गृहिणींना घर स्वच्छतेला प्राधान्यक्रम द्यावा लागतो. उलट एखादा सण जवळ आला की, गृहिणींच्या मनावर सगळ्यात जास्त ताण असतो तो घराच्या स्वच्छतेचा. कारण घराची साफसफाई केल्यानंतर अनेक गृहिणींना आजारांना सामोरे जावे लागते.
चार दिवसांनंतर घरोघरी श्री गणेशाचे आगमन होणार आहे. मग अशा वेळी आपले आरोग्य अबाधित ठेवून घर स्वच्छता करण्यासाठीच्या या काही टिप्स.
उत्सवाच्या काळात सगळीकडे आनंददायी आणि समृद्धीचे वातावरण असते. ज्या गृहिणींनी आपल्या कामवाल्या बाईपुढे हात टेकले आहेत किंवा झाडणे-पुसण्याची मोहीम स्वत:च हाती घेतली आहे त्यांनी हे काम स्वत:च आणि जास्तीत-जास्त योग्य पद्धतीने कसे करायचे याचा विचार करणे गरजेचे आहे.
खाली दिलेल्या सहा झटपट उपायांमुळे तुमचे घर स्वच्छ करण्याची प्रक्रिया जलद आणि विनाअडथळा होईल.
कामाचाी विभागणी करा : सगळे घर एकाच दमात स्वच्छ करायचे ठरवले, तर तुमचा वेळ आणि प्रयत्न दोन्ही वाया जाईल. तुमचे काम आणि प्रयत्न यांचा प्राधान्यक्रम ठरवा. तुमचा वेळ आधी फर्निचर पुसणे, नंतर भिंती, दिवे, पंखे, कारपेट्स पुसणे इत्यादींमध्ये वाटून घ्या.
अनावश्यक वस्तू टाकून द्या : लक्षात ठेवण्याजोगी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातील अनावश्यक गोष्टी काढून टाका. नको असलेल्या वस्तू देऊन टाका आणि घरातला पसारा आवरा.
हाताने की यंत्राने : शंभर टक्के स्वच्छता करणे अनेकांना शक्य होत नाही. कधी हाताने तर कधी व्हॅक्युम क्लीनरने स्वच्छता करायची हे पक्के ठरवा. ज्या ठिकाणी हाताने स्वच्छता करता येणे शक्य नसते, उदा. कारपेट, पलंगाखालची जागा, खिडक्या, ग्रिल्स व इतर कोपऱ्यांमध्ये व्हॅक्युम क्लीनर वापरा.
आधुनिक तंत्रज्ञान : बाजारपेठेत आलेल्या नव्या आणि आधुनिक उत्पादनांच्या मदतीने नेहमीच्या फडक्याला किंवा मॉपला सुट्टी देता येईल. स्प्रे मॉपचा वापर करून फरशी चकचकीत स्वच्छ करता येईल. नव्या प्रकारचे स्प्रे मॉप्स हातात सहज धरता येण्यासारखे असल्यामुळे वाकून पुसत पाठ दुखवून घेण्याची तसेच हात खराब करण्याची गरज नाही.
यूव्ही सॅनिटायझर : नव्या युगातल्या क्लीनर्समध्ये यूव्ही सॅनिटायझर्सचा पर्याय असतो, ज्यामुळे घरगुती स्वच्छतेचा दर्जा आणखी सुधारता येतो. रसायनांचा वापर न करताही घर काही मिनिटांत जंतूमुक्त आणि चकचकीत करता येते. मात्र, असे सॅनिटायझर्स व्हॅक्युम क्लीनरवर बसवण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
वाकणे नाही, पाठदुखी नाही : डॉक्टरांच्या मते, ७० टक्के भारतीय महिलांना दैनंदिन काम, झाडलोट यामुळे वयाच्या चाळिशीपासून पाठदुखीचा त्रास सुरू होतो. आजकाल बाजारात सहज वापरता येण्यासारखी उपकरणे मिळतात, ज्यात बसवलेल्या इन्स्टंट स्प्रेमुळे एकवेळ पुसण्यासाठी लागणारे पाणी बाहेर पडते. त्याशिवाय ओले आणि कोरडे व्हॅक्युम क्लीनर्स वापरता येतील, ज्यात अनुक्रमे हवेतून घाण आणि धूळ शोषून घेणे, जमिनीवर पडलेले ओले पदार्थ शोषून घेणे असे पर्याय दिलेले असतात. अशा सोप्या टिप्सच्या मदतीने गणेशोत्सवात तुमचे आरोग्य अबाधित राहील.
शशांक सिन्हा
लेखक युरेका फोर्ब्स लिमिटेडचे वरिष्ठ व्यवस्थापक आहेत.

upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
gut health diet
आतड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी ‘या’ बाबी आवश्यक; अन्यथा पोटाची दुर्दशा
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…