मुंबई महापालिकेत शिवसेनेचा महापौर झाला तर आनंदच होईल, माझं कुळ आणि मूळ तेच आहे, अशी सूचक प्रतिक्रिया मनसेचे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी दिली. ते बुधवारी पुण्यातील वाडेश्वर कट्ट्यावर बोलत होते. नांदगावकरांच्या या विधानामुळे आता मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि मनसे यांची युती होण्याच्या शक्यता वाढल्या आहेत.