संक्रांतीला तीळगूळ वाटताना  एरवी अशुभ मानल्या जाणाऱ्या काळ्या रंगाला असतं एक वेगळंच महत्त्व.. पण त्याखेरीजही आहे त्याचं अस्तित्व.. जे केलं जातं नजरेआड.. त्यासाठीच त्याला  मनमोकळं पत्र..

०००

Loksatta editorial indian Ambassador Akhilesh Mishra has slammed an Irish Newspaper for publishing an editorial on PM Narendra Modi
अग्रलेख: आजचा मुत्सद्दी, उद्याचा मंत्री?
d. gukesh
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: गुकेशची विदितवर मात
Loksatta explained Due to the continuous increase in mustard production, the discussion of yellow revolution is starting
विश्लेषण: देश पिवळय़ा क्रांतीच्या दिशेने..
mumbai gudi padwa celebration
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण, शिवराज्याभिषेकाचे प्रतिबिंब; गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रांमध्ये तरुणाईचा सहभाग वाढवण्यावर भर

मित्रा, ओळखलंस का तू मला? कारण कसंय की, या आठवडय़ाभरात तुझी ओळखपाळख दाखवणारे, तुझी वाहवा करणारे अनेकजण तुला भेटतील. मग ते कदाचित तुला त्यांचे बेस्ट फ्रेण्ड म्हणवतील किंवा अगदी नातलगसुद्धा. कारण एकच.. द वन अँड ओन्ली ‘ब्लॅकफेम’ आपला पारंपरिक संक्रांतीचा सण.. त्यानिमित्तानं तुझे अगदी आठवून आठवून गोडवे गायले जातात. हे गोडवे गाताना कृष्ण-विठोबा अशा देवांपासून ते आजकालच्या डार्क-हॅण्डसम अँक्टर्सपर्यंत कुणीही यातून सुटत नाही. पण एरवी अनेकजण तुला पाहून नाकं मुरडतात. ‘काळ्या’.. म्हणून हिणवतात. ‘यंगिस्ताना’त मात्र सुखेनैव तुझीच सत्ता चालते. ‘ब्लॅक इज रियली ब्युटिफुल’.. असं म्हणत अनेक यंगस्टर्स सदैव तुला आपलंसं म्हणतात. काही सेलेब्जप्रमाणं तेही कायम काळ्या वेशभूषेचाच वापर करतात. मग तो ड्रेस असो, जीन्स-टॉप-शर्ट काहीही असो.. भले मग या ‘काळ्या अवतारा’वरून घरच्यांनी कितीही रागे भरले किंवा कानीकपाळी सुनवलं, तरीही ते तुझी साथ कधीही सोडत नाहीत. टीनएजर्सपासून ते ऑफिस गोअर्सपर्यंत ही मंडळी डायहार्ट तुझीच फॅन असतात. कारण केवळ कॉलेज डेजमधल्या ‘ब्लॅक अँड व्हाइट डे’पुरतंच हे फीलिंग मर्यादित नसतं.. किंवा थंडीतल्या कपडय़ांवर पडणाऱ्या केसांच्या कोंडय़ाला घाबरून काळ्या रंगाचे कपडे घालणं सोडून देणं, असल्या गोष्टी ते कधीच करत नाहीत.

मित्रा, आता तरी मला ओळखलंस का तू? कारण कसंय की, तुझ्या सगळ्या फीलिंग्ज माझ्याचसारख्या असणार, हे मी केव्हाच ओळखलंय. कारण म्हटलं तर आपण आहोत एक जोडगोळी, म्हटलं तर आहोत भाऊ , म्हटलं तर मित्र किंवा म्हटलं तर अगदी टोकाचंच बोलायचं झालं तर शत्रूही.. म्हटलं तर आपण एकमेकांना पूरक.. म्हटलं तर आपण म्हणजे एकदम कडक कॉन्स्ट्रास्ट.. म्हटलं तर एकमेकांत मिसळून किंवा म्हटलं तर आणखी काहीजणांना साथीला घेऊन चटकन बदलूनच टाकतो आपण कलर पॅलेटचं रूप.. थोडा तू.. थोडा मी.. मिलकर बने नयी कहानी.. या कभी कभी वो भी पुरानी.. यादें रंगीन हैं, फिर भी दिल सैलानी.. आयला, मी तर एकदम शायरीमध्येच घुसलो बघ.. हां, आता कदाचित गुलजारसाबसारख्या कविमनानं मला आपलंसं म्हटल्याचा परिणाम असेल हा.. पण मित्रा, वाईट नको वाटून घेऊ.. तुलाही मिळत्येय आताशा समाजमान्यता.. त्याचीच खूण ही, तो बघ कसा उडतोय पतंग.. घेणारेय उंचच उंच भराऱ्या.. नव्या आशांच्या.. नव्या आकांक्षांच्या.. सतत आकाशाकडे झेपावणाऱ्या सकारात्मकतेच्या..

मित्रा, पटली का आता तरी ओळख? की आशाताईंच्या स्वरातलं ते गीत पुन्हा एकदा ऐकायचंय.. ‘एका तळ्यात होती..’ आत्ता हसलास ना, तो दिसलास बरं का मला.. अरे, इकडंतिकडं शोधू नकोसच मला.. मी इथंच आहे, तुझ्याच शेजारी.. अनंतकाळापासून.. आपल्या दुकलीला कोण काही म्हणतं, कोण काही.. म्हणून म्हटलं या वेळी आपणच व्हावं जरा व्यक्त.. प्रत्येकाला आहे ना अभिव्यक्तिस्वातंत्र्य.. अर्थात माझ्यावर तू उमटलास की अलीकडं थोडी चिंताच वाटायला लागते.. पॅरिससारख्या घटनांनी मन पुन्हा पुन्हा आक्रंदते.. ते काहीही असलं तर व्यक्त होणं, आहे काळाची गरज.. त्यासाठीच तर पुन्हा पुन्हा आपलं अस्तित्व होतंय सिद्ध.. माणुसकी अबाधित ठेवायला आपण कायम राहू कटिबद्ध.. चल घे, हाती हात.. निभावूया साथ.. लढाई अस्तित्वाची.. वृत्तींची.. कडू-गोडाची.. शांती-अशांतीची.. त्यात जिंकावं लागेल आपल्याला.. सर्वाच्या भल्यासाठी.. सुखासाठी..

कायम तुझाच, व्हाइट.
राधिका कुंटे – response.lokprabha@expressindia.com