vv41संतोष गावडे, वर्षां काजरेकर, विनोद पाटील आणि चेतन नांदुरकर या मित्रमंडळींसमवेत चार किल्ल्यांची चढाई केली. दोन दिवसात शिवनेरी, हडसर, निमगिरी आणि चावंड किल्ले सर केले. चावंड किल्ल्यासाठी ही नदी ओलांडून जाण्यापूर्वीचा हा क्षण – केवडी गावानजिक सोनी सायबरशॉट कॅमेऱ्यातून टिपला आहे.

तुमच्या भटकंतीत मनाला भावलेल्या जागा क्लिक करून आम्हाला पाठवायच्या.  ते आठवणीतले क्षणही आमच्याबरोबर शेअर करायचे. फोटो कुठल्या कॅमेऱ्यातून काढलाय आणि कुठे काढलाय याचे डिटेल्सही सांगायचे आणि तुमचं राहण्याचं ठिकाणही आम्हाला कळवायचं. फोटो पाठवताना सब्जेक्टमध्ये क्लिक लिहायला मात्र विसरु नका. तुमचे फोटो आम्हाला  viva.loksatta@gmail.com या मेलवर पाठवा.