‘इंडियन एक्स्प्रेस’चे तीन छायाचित्रकार ‘मुंबई प्रेस क्लब’च्या कॅलेंडर अ‍ॅवॉर्डचे मानकरी ठरले

* इकडे आड तिकडे विहीर..
पाऊस जोरात पडतोय, पाणीच पाणी चहूकडे होऊन घरी परतायचे मार्ग बंद होण्याआधी घर गाठायचं होतं. पण, इथे तर आधीच तळं झालं आहे. आता पुन्हा बसमध्ये शिरायचं की या पाण्यात उडी टाकायची?
-गणेश शिर्सेकर

 

 

 

 

आता काळ्याठिक्कर पडलेल्या याच धुरांडयांतून मुंबईत कधीकाळी सोन्याचा धूर निघत होता, असे म्हणतात. आज गगनचुंबी इमारतीतून सोनेरी स्वप्न पाहणाऱ्या मुंबईला या बंद पडलेल्या गिरण्यांमागचा इतिहास विसरू म्हणता विसरता येणार नाही.
-वसंत प्रभू

 

लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात.. एकाच रंगाचे कपडे घालून बोहल्यावर चढलेल्या या हजारो आदिवासी जोडप्यांना हा लग्नमंडपच स्वर्गासमान भासला असेल.
-दिलीप कागडा