दिव्यांच्या झगझगाटात सोन्या जवहिऱ्यांनी सजलेल्या आनंदी चेहऱ्याच्या लक्ष्मीला आमंत्रित करून उद्या, गुरुवारी घरोघरी व प्रतिष्ठांनामध्ये लक्ष्मीची पूजा करण्यात येणार आहे. प्रदोषकाळी म्हणजेच सायंकाळी ५.४० ते ८.१० दरम्यान लक्ष्मीची पूजा करावी. ज्या शिवलिखित मुहुर्तावर लाभसमयी म्हणजे सायंकाळी ५ ते ६.३० या वेळेत लक्ष्मीपूजन करावयाचे. शिवाय सायंकाळी ६.३० ते ८ वाजेपर्यंत पूजन करावे. ज्यांना स्थिर लग्नावर लक्ष्मीची पूजा करावयाची असेल त्यांनी सायंकाळी ५.४४ ते ८.४८ या वेळेत व शुभ मुहुर्तावर पूजा करायची असेल तर रात्री ११.३० ते १२.३० या वेळेत पूजा करावी. रात्री १२.३० ते पहाटे २ ही अमृतवेळ असल्याने यावेळी पूजा करता येईल, अशी माहिती पंचागकर्त्यां विद्या राजंदेकर यांनी दिली. साधारणत: व्यापारी शुभ मुहुर्तावर लक्ष्मीपूजन करीत असतात. लक्ष्मीपूजनानंतर परिसरात राहणाऱ्यांना घरी बोलावून प्रसाद द्यावा. लक्ष्मीपूजनाच्यावेळी घराला आंब्याचे तोरण बांधावे, व्यापाऱ्यांनी वही खात्याची पूजा करावी.