केद्र सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या वतीने प्राप्त निदेशानुसार महात्मा गांधी जयंतीच्या दिनांचे औचित्य साधून स्वच्छ भारत अभियान राबविण्याचे नवी मुंबई महानगरपालिकाचे आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी निश्चित केले असून सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन हे अभियान यशस्वीपणे पार पाडण्याच्या सुचना संबधित विभागला केल्या आहेत. यावेळी शहर स्वच्छेतेबरोबर सार्वजनिक जागा, सार्वजनिक प्रसाधनगृहे, तलाव स्वच्छतेवरही भर देण्याचे सुचित केले आहे. तसेच शालेच विद्यार्थ्यांना स्वच्छेतचा संदेश मनामध्य रुजविण्यासाठी शालेय पातळीवर स्वच्छता विषयांवरील चित्रकलेसारख्या स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे. ३१ ऑक्टोबर पर्यत अभियांनाचा पहिला टप्पा राबविण्यात येणार आहे. यानुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे व कामाचे नियोजन करण्याबाबत स्वच्छता अभियानाच्या अनुषंगाने नागरिकांनीही स्वयंस्फुर्तीने आपले घर, आपला परिसर स्वच्छ ठेऊन पर्यायाने आपला विभाग, आपले नवी मुंबई शहर स्वच्छ व सुंदर राहिल या करिता योगदान द्यावे असे आवाहन नागरिकांना आयुक्त जऱ्हाड यांनी केले आहे.