चाकण एमआयडीसीतील घटना
चाकण येथील फोक्सव्ॉगन या बहुराष्ट्रीय कंपनीच्या कामगाराने गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास कंपनीच्या शौचालयात धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून आत्महत्या केली. आत्महत्येमागील कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.  
गोविंद किसनराव बांगेवार (वय २८, सध्या रा. चिखली. मूळ रा. मु. धानोरा, पो. हातगाव, नांदेड.) असे या कामगाराचे नाव आहे. गोविंद हा गुरुवारी कामावर होता. दुपारी तो शौचालयात गेला. तेथे त्याने धारदार शस्त्राने स्वत:च्या गळ्यावर वार केले. हा प्रकार कामगार व व्यवस्थापकांच्या लक्षात आल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात हालविण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या कामगाराने कंपनीमध्ये आत्महत्या का केली किंवा त्याचे नेमके कारण काय याचा तपास पोलीस करीत आहेत.