वेगात आलेल्या ट्रकने ऑटो रिक्षाला धडक दिल्याने ऑटोतील एक महिला प्रवासी ठार तर पाच प्रवासी गंभीर जखमी झाले. कामठी मार्गावरील मारुती शोरूम चौकात गुरुवारी पहाटे हा अपघात घडला.
रमाबाई काठिबा देबाई हे मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे. विकास गुलाबराव देशभ्रतार (रा. कु ऱ्हाडकर पेठ) त्यांच्या भाचीच्या मुलाचे लग्न असल्याने मध्यरात्रीच्या सुमारास यशोधरा लॉनकडे ऑटो रिक्षाने (एमएच/४९/डी/३३९९) मध्यरात्रीच्या सुमारास इंदोरा चौकाकडून निघाले. मारुती शोरूम चौकात वेगात आलेल्या एका ट्रकने ऑटो रिक्षाला जबर धडक दिली. या अपघातात ऑटो रिक्षात बसलेली रमाबाई ठार झाली. चालक व चार महिलांसह एकूण पाचजण गंभीर जखमी झाले. त्यांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
दुसरी घटना ग्रेट नाग रोडवरील सरदार पटेल चौकात बुधवारी रात्री घडली. कुणाल विश्वनाथ राऊत (रा. नंदनवन) हा मित्रासह मोटारसायकलने धंतोलीकडे जात होता. पटेल चौकात रस्त्यावरील दगडामुळे वाहन उसळल्याने कुणाल खाली पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
याप्रकरणी इमामवाडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.