सामजिक विकासाशी संबंधित विविध पैलूंचे विश्लेषण करणाऱ्या अभ्यासक्रमांची आणि हे अभ्यासक्रम उपलब्ध असलेल्या शिक्षणसंस्थांची ओळख..
काही वैशिष्टय़पूर्ण अभ्यासक्रमांमध्ये सामजिक विकासाशी संबंधित विविध पैलूंचा अभ्यास व विश्लेषण केले जाते. मानव्यशास्त्राशी संबंधित अशा या अभ्यासक्रमांबाबत अधिक जाणून घेऊयात..

* राजीव गांधी नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ यूथ डेव्हलपमेंट
राजीव गांधी नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ यूथ डेव्हलपमेंट या संस्थेची स्थापना केंद्र सरकारने केली असून ही संस्था केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. केंद्र सरकारने या संस्थेला ‘इन्स्टिटय़ूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स’चा दर्जा प्रदान केला आहे.
या संस्थेने मास्टर ऑफ आर्ट्स इन डेव्हलपमेन्ट प्रॅक्टिस, मास्टर ऑफ आर्ट्स इन सोशल इनोव्हेशन्स अ‍ॅण्ड आंत्रप्रेन्युअरशीप, मास्टर ऑफ आर्ट्स इन जेन्डर स्टडीज, मास्टर ऑफ आर्ट्स इन लाइफ सोशल वर्क विथ स्पेशालयझेशन इन युथ अ‍ॅण्ड कम्युनिटी डेव्हलपमेंट, मास्टर ऑफ आर्ट्स इन लोकल गव्हर्नन्स अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट असे नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू केले आहेत.
अर्हता- संस्थेच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही ज्ञानशाखेतील पदवी किमान ४५ टक्के गुणांनी प्राप्त केलेले असणे अनिवार्य आहे. शासकीय नियमानुसार संस्थेत राखीव जागा आहेत.
संस्थेच्या प्लेसमेन्ट सेलद्वारे संस्थेतील विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम करिअरच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी साहाय्य केले जाते. विषयानुरूप विविध कार्यशाळा सातत्याने आयोजित केल्या जातात. प्रयोगात्मक शिक्षण, विश्लेषणात्मक दूरदृष्टी या बाबींचा विकास होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात.
पत्ता- द रजिस्ट्रार राजीव गांधी नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ यूथ डेव्हलपमेंट, चेन्नई- बेंगळुरू हायवे, बीमानथंगल, श्रीपेरांबुदूर-६०२१०५, तामिळनाडू.
ईमेल- app@rgniydgov.in
संकेतस्थळ- http://www.rgniyd.gov.in

Medical, postgraduate seats,
आनंदवार्ता ! वैद्यकीय शाखेत नवीन अभ्यासक्रम, पदव्युत्तर जागांमध्येही होणार वाढ
Online admission, hostels,
विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! वसतिगृहांमध्ये लवकरच ‘ऑनलाईन’ प्रवेशप्रक्रिया
MSBTE, Maharashtra State Board of Technical Education, Multiple Entry Exit Option, Multiple Entry Exit Option for Diploma , architechture diploma, engineering diploma, education news, diploma news, new education policy,
तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी मल्टिपल एंट्री-एक्झिटचा पर्याय लागू… काय आहे निर्णय?
filing of criminal cases against students who submit fake certificates Warning of Directorate of Technical Education
… तर विद्यार्थ्यांवर दाखल करणार फौजदारी गुन्हे; तंत्रशिक्षण संचालनालयाचा इशारा
UGC cautions against online degree courses using short forms
लघुरूप वापरलेल्या ऑनलाइन पदवी अभ्यासक्रबाबत युजीसीचा सावधगिरीचा इशारा
private schools within one km of govt schools not obligated to have rte seats
वर्गभेद निर्माण करणारा शिक्षण हक्क!
The University Grants Commission UGC has decided to allow universities to conduct postgraduate degree courses online remotely pune news
एकीकडे मोकळीक, दुसरीकडे नियमांचे बंधन… शिक्षण संस्थांचे म्हणणे काय?
rte marathi news, rte latest marathi news
आरटीई अंतर्गत बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या चौथी, सातवीनंतरच्या शिक्षणाचे काय होणार?

 

* अझीम प्रेमजी युनिव्हर्सटिी
या संस्थेने बी.ए इन इकॉनॉमिक्स आणि बी.ए इन कम्बाइन्ड ुमॅनिटीज (इतिहास, भाषा आणि साहित्य, तत्वज्ञान) या विषयांमध्ये पदवीस्तरीय अभ्यासक्रम सुरू केले आहेत.
अर्हता- कोणत्याही विषयात बारावी विज्ञान परीक्षेत ५०% गुण.
पदव्युत्तर पदवी स्तरावरील अभ्यासक्रम-
मास्टर ऑफ आर्ट्स इन डेव्हलपमेंट : या अभ्यासक्रमांतर्गत सस्टेनॅबिलिटी, लाइव्हहूड्स, हेल्थ अ‍ॅण्ड न्युट्रिशन, लॉ अ‍ॅण्ड गव्हर्नन्स आणि पब्लिक पॉलिसी या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते.
मास्टर ऑफ आर्ट्स इन पब्लिक पॉलिसी अ‍ॅण्ड गव्हर्नन्स :
सामाजिक क्षेत्राशी निगडित उद्योजकता निर्मितीसाठी आणि विकास प्रक्रियेच्या परस्परसंबंधित विविध बाजू समजून घेण्याच्या दृष्टीनेही हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी- दोन वष्रे.
अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. या क्षेत्रातील अनुभव असल्यास प्रवेशाच्या वेळी प्राधान्य दिले जाते. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी चाळणी परीक्षा आणि मुलाखत घेतली जाते. या प्रवेशपरीक्षेचे महाराष्ट्रातील केंद्र मुंबई आहे.
संपर्क- अ‍ॅडमिशन सेल, पीईएस कॅम्पस, पिक्सेल पार्क, बी ब्लॉक, इलेक्ट्रॉनिक्स सिटी, हौसर रोड, बंगळुरू- ५६०१००. संकेतस्थळ- http://www.azimpremjiuniversity.edu.in
ईमेल- admissions@apu.edu.in

 

* इंदिरा गांधी इन्स्टिटय़ूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च
मुंबई येथील ही संस्था अर्थकारण आणि विकास या विषयातील उच्च शिक्षणाची आणि संशोधनाची संधी देणारी आपल्या देशातील महत्वाची संस्था आहे. या संस्थेमार्फत पुढील अभ्यासक्रम उपलब्ध आहेत-
मास्टर ऑफ सायन्स इन इकॉनॉमिक्स (एम.एस्सी- इकॉनॉमिक्स) : अर्हता- बी.ए/ बी.एस्सी (इकॉनॉमिक्स) बी.कॉम/ बी.स्टॅट/ बी.एस्सी (भौतिकशास्त्र किंवा गणित)/ बी.टेक, बी.ई. यांपकी कोणताही पदवी प्राप्त केलेली असावी. अर्थशास्त्र हा विषय घेऊन पदवी घेतलेल्या उमेदवारांना ५५ टक्के आणि इतरांना ६० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. पदवी प्राप्त उमेदवारांनी किमान बारावीला गणिताचा अभ्यास केलेला असावा.
एम.फिल/ पीएच.डी. इन डेव्हलपमेंट स्टडीज : विकास ही संकल्पना अंतर्भूत असलेल्या अर्थशास्त्रातील संशोधन करण्याची संधी या अभ्यासक्रमाद्वारे प्राप्त होते. हा आंतरशाखीय अभ्यासक्रम आहे. कालावधी- दोन वर्षे. पीएच.डी. कालावधी- चार वर्षे. अर्हता- एम.ए./ एम.एस्सी (इकॉनॉमिक्स)/ एम.स्टॅट.
दोन्ही अभ्यासक्रमांच्या निवडीसाठी लेखी परीक्षा व मुलाखत घेतली जाते. लेखी परीक्षेत उमेदवारांचे विश्लेषणात्मक, शाब्दिक आणि गणिती कौशल्य समजून घेण्यासाठी प्रश्न विचारले जातात. ही परीक्षा भोपाळ, बंगळुरू, अहमदाबाद, नवी दिल्ली, कोलकाता, रायपूर, जयपूर आणि मुंबई या केंद्रांवर घेतली जाईल. मुलाखत मुंबई येथे घेतली जाईल.
पत्ता- द रजिस्ट्रार, इंदिरा गांधी इन्स्टिटय़ूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च, जनरल ए. के. वैद्य मार्ग, गोरेगाव (पूर्व),
मुंबई- ४०००६५. संकेतस्थळ- http://www.igidr.ac.in
ईमेल- registrar@igidr.ac.in

 

* जिंदाल स्कूल ऑफ इंटरनॅशनल अफेअर्स
या संस्थेच्या ओ. पी. जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सटिीने सुरू केलेले अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत-
* बी.ए. ऑनर्स इन ग्लोबल स्टडीज : अर्हता- ५० टक्के गुणांसह कोणत्याही विषयातील बारावी.
* मास्टर ऑफ आर्ट्स इन डिप्लोमसी, लॉ अँड बिझनेस : कालावधी- दोन वर्षे. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. या अभ्यासक्रमाला चाळणी परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो. या अभ्यासक्रमामध्ये आंतरराष्ट्रीय संघर्ष, मानवी हक्क, मानवी सहाय्यता, आíथक विकास, आंतरराष्ट्रीय न्यायप्रणाली, राजकीय आणि आíथक जोखीमेचे विश्लेषण यांसारख्या विषयांचे ज्ञान उमेदवारांना दिले जाते. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना संयुक्त राष्ट्र संघ, आंतरशासकीय संस्था, परराष्ट्र व्यवहार आणि व्यूहनीती विचार प्रक्रिया केंद्र, बहुराष्ट्रीय संस्था, आंतरराष्ट्रीय सहाय्यता संस्था, जगातील प्रमुख स्वयंसेवी संस्था यामध्ये करिअर करण्याची संधी मिळू शकते.
पत्ता- अ‍ॅडमिशन अण्ड स्टुडंट आऊटरिच सेल, सोनीपत- नरेला रोड, जगदिशपूर व्हिलेज, सोनिपत, हरयाणा- १३१००१.
ईमेल – admissions.jsia@gmail.com
संकेतस्थळ – http://www.jsia.edu.in

 

* सेंट्रल युनिव्हर्सटिी, पंजाब
या संस्थेने पुढील पदव्युत्तर पदवी आणि पीएच.डी अभ्यासक्रम सुरू केले आहेत- इंटिग्रेटेड प्रोग्रॅम फॉर मास्टर ऑफ फिलासॉफी अ‍ॅण्ड पीएच.डी इन डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स, इंटिग्रेटेड प्रोग्रॅम फॉर मास्टर ऑफ फिलॉसॉफी अ‍ॅण्ड पीएच.डी इन साऊथ अ‍ॅण्ड सेंट्रल एशियन स्टडीज. या अभ्यासक्रमांना चाळणी परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो.
महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे- मुंबई आणि नागपूर.
पत्ता- सिटी कॅम्पस मन्सा रोड, भटिंडा- १५१००१.
ईमेल- cu.punjab.info@gmail.com
संकेतस्थळ- http://www.centralunpunjab.com