मुंबई : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी होत असून निवडणूक कर्मचारी, सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी; तसेच मतदान यंत्र, साहित्य मतदान केंद्रात सोडण्याचे आणि मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर परत घेऊन येण्यासाठी एसटी, बेस्ट बस धावणार आहेत. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात बेस्ट बसच्या ६२९ बस धावणार असून, एसटीच्या पाचव्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघात १,१६१ बस धावतील. बेस्टच्या बसमधून दिव्यांग मतदारांना मोफत प्रवास करता येणार आहे.

महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होत असून पहिल्या टप्प्यापासून ते पाचव्या टप्प्यांपर्यंत एसटी महामंडळाने राज्यभरात एकूण ८,९४५ बस निवडणुकीच्या कामासाठी वापरल्या. पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणूक २० मे रोजी एकूण १३ मतदारसंघांत मतदान होणार आहे. यात मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यासह ठाणे, भिवंडी, कल्याण, पालघर, नाशिक, दिंडोरी, धुळे या मतदारसंघात मतदान होईल. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघासाठी १२७ बसचे आरक्षण करण्यात येणार आहे. तर, पालघर लोकसभा मतदारसंघात २५४ बस, ठाणे, भिवंडी, कल्याण ६५ बस, नाशिक आणि दिंडोरी ५१५ बस, धुळ्यासाठी २०० बस धावणार आहेत. अशा एकूण एसटीच्या १,१६१ बस धावणार आहेत.

Thane district candidates withdraw, candidates election Thane, Thane,
ठाणे जिल्ह्यात ९० उमेदवारांची निवडणुकीतून माघार, जिल्ह्यात २४४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
nagpur total 717 candidates in arena with fadnavis and bawankule
फडणवीस, बावनकुळे, केदार, देशमुखांसह २१७ रिंगणात
Multi-candidate contests on most seats in Nashik 196 candidates in 15 constituencies
नाशिकमध्ये बहुसंख्य जागांवर बहुरंगी लढती; १५ मतदारसंघात १९६ उमेदवार
nagpur in seven constituencies After 77 candidates withdrew 102 candidates remain
यवतमाळ जिल्ह्यात बाजोरीया, नाईक, उकंडेंसह ७७ जणांची माघार…आता मैदानात…
Uttarakhand Bus Accident News
Uttarakhand Bus Accident : उत्तराखंडच्या अल्मोडा दरीत बस कोसळून २३ प्रवाशांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
BEST employees protested for Diwali bonus and other demands
‘बेस्ट’च्या अचानक संपाने प्रवाशांचे हाल; भाऊबीजेला चालकवाहकांचे काम बंद आंदोलन
close race between Kamala Harris and Donald Trump in US election 2024
अमेरिकेत अध्यक्षपदासाठी डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यात अभूतपूर्व चुरस! अधिक मते मिळूनही होऊ शकतो पराभव?

हेही वाचा >>>अमोल कीर्तिकर यांच्या प्रचार सभेत दगडफेक, दगडफेक करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघातील दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहचवण्यासाठी बेस्ट उपक्रमाची बससेवा उपलब्ध असणार आहे. या सेवेसाठी मतदारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. तसेच ही सेवा मुंबई शहरांसह उपनगरांतही लागू आहे. मुंबई उपगनरात ३८२ बस मुंबई शहरात २१२ बस अशा एकूण ५९४ बस धावणार आहेत. तर, मुंबई शहर भागात व्हीलचेअर असलेल्या १० आणि उपनगरांत २५ अशा एकूण ३५ बस धावणार आहेत. १८ ते २० मेपर्यंत बेस्ट उपक्रमाच्या ६२९ बसगाड्या संपूर्ण मुंबईभर धावणार आहेत.

एसटी महामंडळाला प्रत्येक बसमागे २४ ते ३० हजार रुपये मिळणार आहेत. तसेच बेस्ट बसलाही तेवढीच रक्कम मिळणार असल्याने एकूण महसूल कोट्यवधीच्या घरात जाण्याचा अंदाज आहे, असे बेस्ट उपक्रमातील आणि एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

२० मे रोजी मुंबईकरांचा प्रवास अवघड

निवडणुकीच्या कामात बेस्ट उपक्रमातील बस उपलब्ध केल्याने २० मे रोजी मुंबईतील रस्त्यांवर बेस्ट बसची संख्या अपुरी असेल. त्यामुळे निवडणुकीच्या दिवशी मुंबईकरांचा प्रवास अवघड होण्याची शक्यता आहे.