मर्सडिीजतर्फे माय मर्सडिीज, माय सíव्हस असा अनोखा उपक्रम नुकताच सुरू करण्यात आला आहे. व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रोलँड फॉल्गर यांनी येथे या उपक्रमाचे उद्घाटन केले. डिजिटल सíव्हस ड्राइव्ह, प्रीमियर एक्स्प्रेस सíव्हस आणि इनॉव्हेटिव्ह सíव्हस उत्पादने या त्रिसूत्रीवर हा उपक्रम आधारलेला आहे. मर्सडिीजतर्फे डिजिटल सíव्हस ड्राइव्ह ही सेवा असलेला अमेरिकेव्यतिरिक्त भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.

अन्य कोणत्याच देशात ही सेवा उपलब्ध नाही. मर्सडिीजच्या ग्राहकांना व्हिडीओ कॉलद्वारे सíव्हस अपडेट्स मिळवता येणार आहेत. लक्झरी कारच्या सेगमेंटमध्ये प्रथमच अशा प्रकारच्या सुविधा देण्यात येत आहेत.