बदलत्या जीवनशैलीमुळे मोटरसायकलची आवडही बदल आहे. महिन्यातून एकदा वा वीकेंड रायिडगला पसंती मिळत आहे. त्यामुळेच स्पोर्ट्स मोटरसायकल, टुिरग मोटरसायकल वा क्रूझर मोटरसायकल बाजारात उपलब्ध आहेत. लाँग ड्रायिव्हिंगचा आनंद हा क्रूझर मोटरसायकलवर मिळतो. भारतात क्रूझर मोटरसायकलचा प्रसार मोठा झालेला नसला तरी हळूहळू हा सेगमेंट वाढत आहे. लाइफस्टाइल या सेगमेंटमध्ये मोडणाऱ्या या मोटरसायकल रायिडगचा वेगळा अनुभव देतात. बजाज ऑटोची अ‍ॅव्हेंजर गेल्या दीड दशकाहून भारतात उपलब्ध आहे. अ‍ॅव्हेंजरची १५० व २२० स्ट्रीट व २२० क्रूझ मॉडेल उपलब्ध आहे. सर्वात स्वस्त किमतीस उपलब्ध असणारी ही देशातील पहिली क्रूझर (१५० सीसी स्ट्रीट) मोटरसायकल आहे.

क्रूझर मोटरसायकल या लीजर रायिडगसाठी असल्याने अ‍ॅव्हेंजरचे डिझाइन हे जागतिक पातळीवरील क्रूझरसारखे आहे. या मोटरसायकलची लांबी २१७७ एमएम, रुंदी ८०१ एमएम आणि उंची १०७० एमएम व ग्राऊंड क्लिअरन्स १६९ आहे. सिटी ड्रायिव्हिंगसाठी क्रूझर वापरता येण्यासाठी बजाजने स्ट्रीट १५० मॉडेलचा पर्याय दिला आहे. शहरातील रस्त्यावर ही मोटरसायकल चालविताना रायडरला त्रास होऊ नये यासाठी छोटे हँडल दिले आहे. २२० क्रूझला ही लाँग ड्रायिव्हगला वापरली जाईल, असे लक्षात घेऊन रायडरला आराम मिळण्यासाठी २२० क्रूझरला मोठे अन् पकड आतील बाजूस वळणारे दिले आहे. स्ट्रीट १५०, स्ट्रीट २२० चा एक्झॉस्ट नवा असून, काळ्या रंगाचे कोटिंग केले आहे. सेमी डिजिटल मीटर, अ‍ॅलॉय व्हिल्स ही नवी वैशिष्टय़े यात असून, सीटची उंची ११ एमएमनी वाढविली आहे. तसेच, अ‍ॅव्हेंजर क्रूझ २२० च्या हँडलबारसाठी क्रोम प्लेटिंगचा वापर केला असून, स्पोक रिम (पुढे १७ इंच व मागे १५ इंच) आहे. मागे बसणाऱ्याला पाठीला आधार मिळण्यासाठी फोम सपोर्ट दिला आहे. क्रूझर मोटरसायकलचा पूर्ण फील येण्यासाठी विंड शिल्डही आहे. हँडलबार,विंड शिल्ड, रंग, क्रोम प्लेटिंग आणि स्पोक व्हील्स यांच्यामुळे अ‍ॅव्हेंजर स्ट्रीट आणि क्रूझ यांच्यातील फरक स्पष्ट दिसतो. तसेच, क्रूझमध्ये डेझर्ट गोल्ड एडिशन उपलब्ध आहे.

ट्विन स्पार्क प्लग व ट्विन व्हॉल्व असणारे १५० सीसी नवे इंजिन स्ट्रीटला, तर क्रूझ २२० व स्ट्रीट २२० ला पूर्वीचेच २२० सीसीचे इंजिन बसविले असले तरी यात तांत्रिक सुधारणा केल्या आहेत. यातील २२० सीसी इंजिन ऑइल कूल्ड, तर १५० सीसी इंजिन एअर कूल्ड आहे. १५० सीसी मॉडेलची पॉवर १४.५४ एचपी आणि १२.५ न्यूटन मीटर टॉर्क आहे. २२० सीसी मॉडेलची पॉवर १९.३ एचपी आणि १७.५ न्यूटन मीटर टॉर्क आहे. स्ट्रीट १५० हायवेलाही उत्तम कामगिरी देते. मात्र, १०० च्या स्पीडला गेल्यावर इंजिनचे व्हायब्रेशन जाणवते. क्रूझ २२० चे हायवेला हँडिलग आरामयदायी वाटते. ९० ते १०० च्या स्पीडला उत्तम कामगिरी देते. हायवेला स्ट्रीट १५० मॉडेलला प्रति लिटर ४० ते ४२ किलोमीटर मायलेज, तर शहरात ३५ ते ३७ किमी मिळू शकते. स्ट्रीट १५० ला पुढील चाकास २४० एमएमचा डिस्क ब्रेक, तर स्ट्रीट २०० ला २६० एमएमचा डिस्क ब्रेक आहे. मागील बाजूने दोन्हीही मॉडेलला १३०० एमएमचा ड्रमब्रेक आहे. फ्यूएल टँक १४ लिटरचा असून, रिझव्‍‌र्ह ३.४ लिटर आहे. स्ट्रीट १५० चे क्रॅब वेट १४८ किलो, स्ट्रीट २२० चे १५० किलो आणि क्रूझ २२० चे १५० किलो वजन आहे. तीनही मोटारसायकलचा पुढील टायर ९०/९०-१७ इंच ४९पी, तर मागील टायर १३०/९०-१५ इंच ६६पी आहे. अ‍ॅव्हेंजर ७७,२६० रुपयांपासून (एक्स-शोरूम) आहे.

मोटसायकल घेऊन वीकेंड ड्रायिव्हिंग वा लाँग ड्रायिव्हगला जावे, असे अनेकांना विशेषत: मोटरसायकलवरून फिरणाऱ्यांना नक्कीच वाटते. क्रूझर मोटरसायकल ही लाँग राइडसाठीच बनविण्यात आली आहे, कारण यावरून प्रवास करणाऱ्यांना लगेज कॅिरगबरोबर आरामदायी प्रवास होतो. तसेच, उंची कमी असल्याने रायडरचे दोन्ही पाय टेकतात आणि रुंद टायर असल्याने ग्रिपही चांगली मिळते. त्यामुळेच क्रेझर मोटरसायकल या वीकेंड ड्रायिव्हग-फ्रेंडली आहेत. जागतिक पातळीवर हायएंड क्रूझर या महाग आहेत. बजाज ऑटोने बाजारपेठेची गरज ओळखून क्रूझर तयार केली आहे. ही क्रूझर नक्कीच चांगली आहे; पण मागच्या सीटचा आकार फार मोठा नसल्याने मागे बसणाऱ्याला लांब पल्ल्याचा प्रवास तुलनेने कमी आराम मिळू शकतो; पण किंमत, डिझाइन, फीचरचा विचार केल्यास अ‍ॅव्हेंजर ही एंट्री लेव्हल क्रूझरमधील एक चांगला पर्याय आहे.

obhide@gmail.com