गुजरातमधील गांधीनगर मधील एका वरिष्ठ महिला डॉक्टरांची फसवणूक करण्यात आली. फसवणूक करणाऱ्यांनी तीन महिन्यात १९ कोटी उकळले. १५ मार्च २०२५ पासून त्यांना कॉल वर फोन कनेक्शन तोडण्याची आणि मनी लाँड्रिंगचा खटला दाखल करण्याची धमकी दिली गेली. खोटे अधिकारी बनून उपनिरीक्षक व सरकारी वकील बनलेल्यांनी तिला भीती दाखवली. नियम पाळावे लागतील, या भीतीपोटी डॉक्टरने तिचे १९ कोटी रुपये ३५ वेगवेगळ्या खात्यांत तीन महिन्यांत ट्रान्सफर केले.सध्या पोलिसांनी सुरतमध्ये एकाला अटक केली असून त्याच्या खात्यात १ कोटी रुपये सापडले. संपूर्ण रॅकेटचा तपास सुरू आहे.

डॉक्टरची ऑनलाईन फसवणूक

डॉक्टरांच्या सोन्याच्या दागिन्यांवर कर्ज काढून फसवणूक करणाऱ्यांनी पैसै उकळले . डॉक्टर सतत फसवणूक करणाऱ्यांच्या संपर्कात होती आणि घराबाहेर पडताना देखील व्हिडिओ कॉलद्वारे त्यांना आपली स्थिती कळवत होती. एक दिवस अचानक कॉल येणे थांबले. त्यानंतर त्यांनी नातेवाईकांना संपर्क साधला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

डिजिटल फसवणुकीचा पर्दाफाश: गुजरात सायबर सेलची मोठी कारवाई

१६ जुलै २०२५ रोजी प्राप्त झालेल्या तक्रारीच्या आधारे, गुजरातमधील सीआयडी क्राईमच्या सायबर सेलने महत्त्वाची कारवाई करत सायबर फसवणुकीप्रकरणी सुरत येथून एका संशयित व्यक्तीला अटक केली आहे. पोलिस तपासात या व्यक्तीच्या बँक खात्यात १ कोटी रुपये आढळून आले.
सूत्रांच्या माहितीनुसार, ही भारतातील सर्वात मोठ्या डिजिटल अटक प्रकरणांपैकी एक आहे, कारण एकाच व्यक्तीकडून इतक्या मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे.पोलिसांकडून संशयिताची चौकशी सुरू असून, या फसवणुकीत सहभागी असलेल्या इतर आरोपींचा छडा लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इतर गुन्हेगारांची ओळख पटवण्यासाठी आणि संपूर्ण रॅकेटचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी सायबर तज्ज्ञांकडून संशयितांच्या डिजिटल पाऊलखुणांचा सखोल मागोवा घेतला जात आहे. पुढील तपास पोलीस अधिकारी घेत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.