‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतून अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनातं घर करणाऱ्या पांडू अर्थात लेखक-अभिनेता प्रल्हाद कुडतरकर नुकताच विवाह बंधनात अडकला. अंजली कानडे हिच्याशी प्रल्हादचा विवाह पार पडला. प्रल्हादची पत्नी योगा प्रशिक्षक आहे. सुयश टिळकने प्रल्हाद आणि त्याची पत्नी अंजली यांच्यासोबतचा एक फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत दोघांना नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सुयशने शेअर केलेल्या फोटोवर अनेक प्रतिक्रिया उमटत असून चाहत्यांसह चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी प्रल्हाद आणि अंजलीला शुभेच्या देताना दिसतय.

पांडू या व्यक्तिरेखेतून प्रल्हादने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान मिळविले होते. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील प्रत्येक पात्रं जणू काही प्रेक्षकांच्या कुटुंबातीलच एक भाग बनून गेले. अण्णा, माई, निलिमा, सरिता, दत्ता, माधव, सुषमा या सर्वच पात्रांच्या गर्दीत प्रल्हादने एक वेगळी ओळख निर्माण केली होती. ‘माईनु…… अण्णा इलंय’ असं म्हणण्याचा त्याचा अंदाज असो किंवा मग ‘कायता…. इसरलंय’ असं म्हणत त्याच्या चेहऱ्यावर उमटणारे विचित्र भाव सध्या तो ‘नकटीसाठी स्थळ शोधतोय, या मालिकेचं लिखाण करतोय तर दुसरीकडे नकटूसाठी स्थळ शोधता शोधता तो स्वत: लग्न बंधनात अडकला आहे.