मुंबई : कांदिवली पूर्व येथे ११ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी इमारतीच्या सुरक्षारक्षकाला समता नगर पोलिसांनी शनिवारी अटक केली. पीडित मुलगी खेळण्यासाठी इमारतीच्या खाली गेली असता आरोपीने तिला असभ्यरीत्या स्पर्श केल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी विनयभंग व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.
११ वर्षीय पीडित मुलगी कांदिवली पूर्व येथील उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहते. शनिवारी पीडित मुलगी इमारतीतील उद्यानात खेळण्यासाठी गेली होती. त्यावेळी उदवाहनातून बाहेर पडताना आरोपीने तिचा हात पकडला. तसेच तिला असभ्यरीत्या स्पर्श केला. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला.