India vs Australia 2023 2nd ODI Match Updates:भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामना रविवारी पार पडला. या सामन्यात भारताचा १० विकेट्सने मोठा पराभव झाला. त्यानंतर तीन सामन्यांची मालिका १-१ ने बरोबरीत आली आहे. विशाखापट्टणमच्या डॉ. वायएस राजशेखर रेड्डी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माची प्रतिक्रिया समोर आली आहे. रोहित शर्माने हा पराभव निराशाजनक असल्याचे म्हटले आहे. या सामन्यात फलंदाजांचे कोणतेही योगदान नव्हते हे त्याने मान्य केले आहे. कारण त्यांनी पुरेशा धावा केल्या नाहीत.

सामन्यानंतर रोहित शर्मा काय म्हणाला?

सामन्यानंतर रोहित शर्मा म्हणाला की, “तुम्ही एखादा सामना गमावला तर ते निराशाजनक आहे, आम्ही स्वतःला बॅटने लागू केले नाही. धावफलकावर पुरेशा धावा केल्या नाहीत. ही ११७ धावसंख्येची खेळपट्टी नव्हते. आम्ही सतत विकेट्स गमावत राहिले. त्यामुळे आम्हाला अपेक्षित धावसंख्या उभारता आली नाही.”

हेही वाचा – IND vs AUS 2nd ODI: मिचेल स्टार्कचा मोठा धमाका! टीम इंडियाने ११ वर्षानंतर केली ‘या’ नकोशा विक्रमाची पुनरावृत्ती

आज आमचा दिवस नव्हता – रोहित शर्मा

सामन्याच्या टर्निंग पॉईंटबद्दल सांगताना रोहित शर्मा म्हणाला की, “आम्ही शुबमनला पहिल्याच षटकातच गमावले. त्यानंतर मी आणि विराटने जलद ३०-३५ धावा केल्या. पण नंतर मी माझी विकेट गमावली आणि आम्ही हरलो, आम्ही सलग दोन विकेट गमावल्या, ज्यामुळे आम्हाी बॅकफूटवर गेलो. त्या स्थितीतून परत येणे नेहमीच कठीण असते. आज आमचा दिवस नव्हता.”

रोहितने स्टार्कचे कौतुक केले –

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ५ विकेट घेणाऱ्या मिचेल स्टार्कचे रोहित शर्माने कौतुक केले. तो म्हणाला की, स्टार्क हा एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. नवीन चेंडूने त्याने ऑस्ट्रेलियासाठी शानदार गोलंदाजी करत आहे. आजच्साया मन्यात तो त्याच्या ताकदीनुसार गोलंदाजी करत राहिला. नवीन चेंडू स्विंग करत होता. त्याचबरोबर इतर चेंडू फलंदाजांपासून दूर ठेवत फलंदाजांचा अंदाज घेत राहिला.

हेही वाचा – IND vs AUS 2nd ODI: मिचेल स्टार्कचा मोठा धमाका! टीम इंडियाने ११ वर्षानंतर केली ‘या’ नकोशा विक्रमाची पुनरावृत्ती

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा एकदिवसीय सामन्यातील स्थिती –

नाणेफेक हारल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी केली. संपूर्ण संघ २६ षटके खेळू शकला आणि केवळ ११७ धावाच करू शकला. ऑस्ट्रेलियाने हे छोटे लक्ष्य केवळ ११ षटकांत पूर्ण केले. सलामीवीर मिचेल मार्शने ६६ तर ट्रॅव्हिस हेडने ५१ धावा केल्या. याआधी ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने ५ विकेट घेतल्या होत्या. भारताकडून विराट कोहलीने ३१ धावांची सर्वात मोठी खेळी खेळली.