scorecardresearch

अगस्त्य नंदा

अगस्त्य नंदा (Agastya Nanda) हा सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा नातू आहे. अमिताभ बच्चनची मुलगी श्वेता बच्चन आणि पती निखिल नंदा यांचा तो मुलगा आहे. अगस्त्य हा राज कपूर यांचाही नातू आहे. अगस्त्यची आजी म्हणजेच वडील निखिल नंदा यांची आई रितू नंदा ही राज कपूर यांची मुलगी आहे. अगस्त्य नंदाचा जन्म २३ नोव्हेंबर २००० रोजी झाला आहे. अगस्त्यने २०१९ मध्ये लंडनच्या ‘सेव्हन ओक्स’मधून शिक्षण पूर्ण केले.


अगस्त्यची मोठी बहीण श्वेता नंदाने पदवी प्रदान सोहळ्याचे फोटो शेअर केले होते. अगस्त्य लवकरच जोया अख्तरच्या ‘द आर्चीस’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटातून पदार्पण करून अभिनय क्षेत्रात अगस्त्य आपले नशीब आजमवणार आहे. या चित्रपटात अगस्त्यसह शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि बोनी कपूरची मुलगी खुश कपूरदेखील दिसणार आहे. अगस्त्य आणि सुहाना खान लहानपणीपासूनचे मित्र आहेत. दरम्यान, दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. ‘द आर्चीस’ प्रदर्शित होण्यापूर्वीच अगस्त्यला आणखी एक चित्रपट मिळाला आहे. चित्रपट निर्माते श्रीराम राघवन यांनी शहीद अरुण खेत्रपाल यांच्या आयुष्यावर आधारित ‘इक्किस’ या चित्रपटाची घोषणा केली आहे.


या चित्रपटात दिग्गज अभिनेते धर्मेंद्र हे चित्रपटात अगस्त्याच्या आजोबांच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट १९७२ मध्ये भारत-पाक युद्धावर आधारित आहे, ज्यामध्ये अवघ्या २१व्या वर्षी अरुण खेत्रपाल हे शहीद झाले होते. अगस्त्यचे दोन्ही चित्रपट पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.


Read More
Jaya Bachchan women are stupid stopping men paying dates Navya 2 show जया बच्चन स्त्रिया फेमिनिजम
डेटवर गेल्यावर बिलाचे पैसे भरणाऱ्या फेमिनिस्ट स्त्रियांना जया बच्चन यांनी लगावला टोला; म्हणाल्या, “त्या किती मूर्ख…”

नव्याची आई श्वेता बच्चन, भाऊ अगस्त्य व आजी जया बच्चन यांच्याशी गप्पा मारताना, नव्याने पुरुष आणि टॉक्सिसिटी या विषयावर चर्चा…

Amitabh Bachchan Grandson Agastya Nanda Makes Instagram Debut Suhana Khan gauri khan welcoming him
अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाची इन्स्टाग्रामवर एन्ट्री, कथित गर्लफ्रेंड सुहाना खानने केलं फॉलो, तर गौरी खानने…

अवघ्या काही तासांत अगस्त्य नंदाचे झाले इन्स्टाग्रामवर ‘इतके’ फॉलोवर्स

LookBack2023 | Year Ender 2023 | 2023 star kids bollywood debut
7 Photos
सुहाना खानपासून पलक तिवारीपर्यंत ‘या’ स्टार किड्सने २०२३मध्ये बॉलिवूडमध्ये केले पदार्पण, कोणी ठरले हिट तर कोणी फ्लॉप

दरवर्षी स्टार किड्स बॉलिवूडमध्ये पदार्पण करतात. 2023 मध्येही अनेक स्टार किड्सनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. त्यापैकी काहींनी त्यांच्या पहिल्या चित्रपटापासूनच प्रेक्षकांना…

agastya suhana
…अन् बिग बींच्या नातवाकडे पाहून लाजली सुहाना खान, अगस्त्य नंदा व शाहरुखच्या लेकीचा ‘तो’ Unseen Photo व्हायरल

गेले अनेक महिने सुहाना अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा याला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

संबंधित बातम्या