बहुचर्चित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट ३० एप्रिलला प्रदर्शित झाला. शाहीर साबळे यांच्या जीवनाचे व व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात आले आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट बघण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहांत गर्दी करत होते.
‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाबाबत प्रेक्षकांना उत्सुकता होती. आता लवकरच हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. २ जूनला ‘महाराष्ट्र शाहीर’ ओटीटी माध्यमावर प्रदर्शित करण्यात येणार आहे. अॅमेझॉन प्राइमवर ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना ओटीटीवर हा चित्रपट पाहता येणार आहे. केदार शिंदेंनी याबाबत पोस्ट शेअर केली आहे.
हेही वाचा>> मुकेश अंबानी पुन्हा झाले आजोबा, आकाश व श्लोका अंबानीला कन्यारत्न
‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरीने शाहीर साबळे यांची भूमिका साकारली आहे. केदार शिंदेंची लेक सना शिंदेने या चित्रपटातून पदार्पण केलं आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटात सना शाहीर साबळे यांच्या पहिल्या पत्नी भानुमती साळबे यांच्या भूमिकेत आहे.
हेही वाचा>> “तू आमच्याबरोबर एकच महिना राहिलीस, पण…”, ‘बिग बॉस’ फेम सुम्बुल तौकीरची भावुक पोस्ट
‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाप्रमाणेच त्यातील गाण्यांनाही प्रेक्षकांनी पसंती दर्शविली. या चित्रपटातील ‘बहरला हा मधुमास’ या गाण्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या गाण्यावरील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.