scorecardresearch

मराठी अभिनेते News

मराठी सिनेसृष्टी ही नाविण्यपूर्ण सिनेअभिनेत्यांनी नटलेली आहे. भारतीय चित्रपटसृष्टीची सुरुवात झाल्यापासून मराठी भाषिक अभिनेते (Marathi Actors) चित्रपटांमध्ये काम करत आहेत. आधीच्या चित्रपटांमध्ये आवाज नसायचा. पुढे बोलपट ही संकल्पना उदयास आली. आणि त्याचबरोबर ठराविक भाषेमध्ये चित्रपट चित्रित आणि प्रदर्शित होऊ लागले. प्रादेशिक तत्वावर त्या-त्या ठिकाणच्या प्रमुख भाषेमध्ये चित्रपट तयार होऊ लागले. याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये मराठी आणि त्यासह हिंदी सिनेमांची निर्मिती होऊ लागली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मराठी सिनेसृष्टीसह एकूणच भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये जलद गतीने बदल होत गेले.


पुढे जाऊन प्रमुख अभिनेते (Marathi Actors)आणि अभिनेत्री यांना अधिकाधिक महत्त्व प्राप्त होऊ लागले. अभिनेत्यांचा चाहता वर्ग वाढत गेला. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये व्ही शांताराम, राजा परांजपे, राजा गोसावी, दादा कोंडके असे अनेक दिग्गज अभिनेते होऊन गेले. अशा अनेक अभिनेत्यांमुळे मराठी प्रेक्षक चित्रपटगृहांकडे वळला. पुढे ही परंपरा रमेश देव, रवींद्र महाजनी, विक्रम गोखले, श्रीराम लागू यांसारख्या मराठी अभिनेत्यांनी चालवली. त्यानंतर सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे यांनी प्रेक्षकांना त्यांच्या चित्रपटांचे वेड लावले. त्याचबरोबरीला नाना पाटेकर, निळू फुले, अमोल पालेकर, सचिन खेडेकर असे काही अभिनेते प्रमुख प्रवाहासह समांतर चित्रपटांमध्येही झळकत होते. पुढे २००० साल उजाडल्यावर भरत जाधव, अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, स्वप्नील जोशी, जितेंद्र जोशी या अभिनेत्यांच्या फळीने आधीची पोकळी भरुन काढण्याचा प्रयत्न केला.


आताच्या घडीला सिद्धार्थ चांदेकर, वैभव तत्त्ववादी, ललित प्रभाकर, अमेय वाघ यांसारखी मंडळी मराठी सिनेसृष्टीसाठी आपले योगदान देत असल्याचे दिसते. लोकसत्ताच्या मराठी अभिनेते या पेजवर अशाच आत्ताच्या पिढीतल्या, जुन्या काळातल्या मराठी अभिनेत्यांची माहिती वाचायला मिळेल.


Read More
marathi actress Varsha Usgaonkar share memories about laxmikant berde
“आज लक्ष्या असता तर…”, वर्षा उसगांवकर यांनी लक्ष्मीकांत बेर्डेंच्या आठवणींना उजाळा देत व्यक्त केली ‘ही’ खंत, म्हणाल्या…

वर्षा उसगांवकर यांनी सांगितलेला लक्ष्मीकांत बेर्डेसंबंधित किस्सा वाचा…

mangesh desai bought new house shrikant shinde and cm wife lata shinde attend griha pravesh pooja
Video : ‘धर्मवीर’ फेम मंगेश देसाईंचा नव्या घरात गृहप्रवेश! मिसेस मुख्यमंत्र्यांसह श्रीकांत शिंदे यांची खास उपस्थिती

‘धर्मवीर’ फेम मंगेश देसाईंनी घेतलं नवीन घर, गृहप्रवेश सोहळ्याला दिग्गजांची खास उपस्थिती, व्हिडीओ व्हायरल

mangesh desai bought new house
‘धर्मवीर’ फेम मंगेश देसाईंनी घेतलं नवीन घर! गणेश जयंतीच्या मुहूर्तावर गृहप्रवेश; दारावरची नेमप्लेट आहे खूपच खास…

अभिनेते मंगेश देसाईंचा नव्या घरात गृहप्रवेश, व्हिडीओ शेअर करत म्हणाले…

viju mane revealed kushal badrike struggle story
“दात पडले, रक्ताने रुमाल माखला अन्…”, विजू मानेंनी सांगितला कुशल बद्रिकेचा कठीण काळ; म्हणाले, “३५ मिनिटं…”

विजू मानेंनी सांगितला कुशल बद्रिकेच्या आयुष्यातील ‘तो’ कठीण काळ; म्हणाले…

mohan agashe shares his opinion about current politics
सद्य राजकीय स्थितीवर ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशेंनी मांडलं परखड मत; म्हणाले, “सगळ्याच नेत्यांकडून…

“राजकारणाचा आता धंदा झालाय”, मोहन आगाशेंनी मांडलं मत, म्हणाले, “प्रामाणिक अन्…”

Sachin Pilgaonkar shared a video on the sets of Navra Maza Navsacha 2
Video: “गणपती बाप्पा मोरया…”, ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाच्या सेटवरील पहिला व्हिडिओ सचिन पिळगांवकरांनी केला शेअर

सचिन पिळगांवकर व्हिडीओ शेअर करत म्हणाले, “शूटिंग सुरू, मज्जा सुरू…”

upendra limaye won award at tirupati as most iconic actor
‘अ‍ॅनिमल’च्या फ्रेडी पाटीलचा जलवा! मराठमोळ्या उपेंद्र लिमयेंचा आंध्र प्रदेशमध्ये मोठा सन्मान; पोस्ट शेअर करत म्हणाले…

‘अ‍ॅनिमल’ गाजवणाऱ्या उपेंद्र लिमयेंचा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत मोठा सन्मान! फ्रेडी पाटीलने जिंकलं प्रेक्षकांचं मन

Sachin Pilgaonkar Navra Maza Navsacha 2 movie coming soon Shooting start from 5 february
मराठी रसिक प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी; लवकरच ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटाचा येणार दुसरा भाग, ‘या’ ज्येष्ठ अभिनेत्याने केला खुलासा

‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला उद्यापासून होणार सुरुवात

gashmeer mahajani shares incident during his father ravindra mahajani death
“आईला उलट्या, कुजलेल्या मांसाचा वास अन्…”, गश्मीर महाजनीला वडिलांच्या निधनाचे ‘असे’ मिळालेले संकेत; म्हणाला…

चौथा अंक : माधवी महाजनी यांचं आत्मचरित्र प्रकाशित, पुस्तक प्रकाशन सोहळ्यात गश्मीर महाजनीने सांगितला ‘तो’ प्रसंग

ravindra mahajani wife madhavi mahajani launch her book
“त्यांचं निधन…”, रवींद्र महाजनींबद्दल पहिल्यांदाच त्यांच्या पत्नीचे विधान; गश्मीर महाजनीच्या उपस्थितीत आत्मचरित्र प्रकाशित

“कुणालाही नायक किंवा व्हिलन बनवण्याचा हेतू नाही, पण…”, रवींद्र महाजनींच्या पत्नीचा ‘चौथा अंक’, गश्मीरच्या उपस्थितीत पुस्तकाचं प्रकाशन

Sharad Ponkshe on caste survey
“माझ्या घरीसुद्धा नगरपालिकावाले आले होते”, जात सर्वेक्षणाबद्दल शरद पोंक्षेंचे विधान; म्हणाले, “मी ब्राह्मण आहे, मला…” प्रीमियम स्टोरी

“दरवाजावर कोणीही आलं तरी…”, शरद पोंक्षे नेमकं काय म्हणाले? जाणून घ्या

ताज्या बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×