बहुआयामी व अभ्यासू अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी कलाकार म्हणजे मुक्ता बर्वे. मुक्ताच्या सहसुंदर व नैसर्गिक अभिनयाचा एक वेगळा आणि मोठा चाहता वर्ग आहे. वैविध्यपूर्ण, आव्हानात्मक भूमिका साकारून मुक्ताने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अशी महाराष्ट्राची लाडकी मुक्ता अवघ्या चार वर्षांची असताना एका लोकप्रिय चित्रपटात झळकली होती. एवढंच नाहीतर ती या चित्रपटात प्रसिद्ध दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डेंबरोबर जबरदस्त नाचली होती.

अभिनेत्री मुक्ता बर्वे नुकतीच ‘राजश्री मराठी’च्या ‘तिची गोष्ट’ या कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी मुक्ताने तो किस्सा सांगितला. अभिनेत्री म्हणाली, “माझा भाऊ उत्तम अभिनेता आहे. त्याने ‘खट्याळ सासू नाठाळ सून’ या चित्रपटात बालकलाकारचं काम केलं होतं. तेव्हा लहान मुलांचं शूटिंग मे महिन्यात असायचं. तर आई मला तिच्याबरोबर दादाच्या शूटिंगला घेऊन गेली होती. मी अवघ्या चार वर्षांची होते; पहिलीत जाणार होते. त्या चित्रपटाच्या गाण्याचं शूटिंग सुरू होतं आणि आई मला एका ठिकाणी घेऊन उभी होती. लक्ष्मीकांत बेर्डे सर, नितीश भारद्वाज, वर्षा उसगावकर, दया डोंगरे, स्मिता तळवलकर, दादा, मोहन जोशी सर असे सगळे गाण्याच्या सिक्वेंसमध्ये होते. आई बाजूला बसली होती, मी शूटिंग बघत उभी होते. जसं गाणं सुरू झालं तसं मी उभं राहून नाचू लागले. तर तेव्हा शॉर्ट कट झाला. कारण मी नाचत नाचत शूटिंग सुरू असलेल्या ठिकाणी गेले होते.”

sonali khare clarifies age difference between husband and her
“आमच्यात २७ वर्षांचं अंतर नाही”, सोनाली खरेने थेट सांगितली नवऱ्यासह तिची जन्मतारीख; म्हणाली, “बायका त्यांचं वय…”
Aarti Singh To Marry Boyfriend Deepak Chauhan
प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”
Shriya Pilgaonkar reacts on fake news of being adopted by parents supriya sachin Pilgaonkar hrc 97
श्रिया सुप्रिया व सचिन पिळगांवकरांची दत्तक मुलगी आहे? स्वतः उत्तर देत म्हणाली, “माझं जन्म प्रमाणपत्र…”
mohena kumari welcomes baby girl
प्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पाच वर्षांपूर्वी अभिनय सोडून मंत्र्याच्या मुलाशी केलंय लग्न

हेही वाचा – ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेत्याने आपल्या लाडक्या मुलीचं ठेवलं ‘हे’ नाव, श्रीकृष्णाशी आहे संबंध

“आई घाबरली की, आपल्यामुळे थांबलं. कारण आपल्याला काही माहिती नसतं, हे क्षेत्र नवीन होतं. दादासाठी आम्ही तिथे गेलो होतो. अण्णासाहेब देऊळगांवकर नावाचे खूप मोठे दिग्दर्शक. पूर्वीच्या मराठी सिनेमात त्यांनी भयंकर काम केलंय. ते म्हणाले, कट…कट. ती छोटी मुलगी निनादची बहीण आहे ना? मास्टर निनाद असं दादाचं सिनेमातलं नाव होतं. त्याला देबू म्हणतात. तर आई म्हणाली, “हो. सॉरी, सॉरी. अण्णासाहेब सॉरी.” मग ते म्हणाले, “नाही नाही. ती खूप चांगली नाचतेय. तिच्याकडे काही कपडे आहेत का?” आई म्हणाली, “हो हॉटेलवर आहेत.” ते म्हणाले, “जा कपडे घेऊन या.” मग आई आणि स्मिताताई तळवलकर युनिटची गाडी घेऊन हॉटेलवर गेल्या. कोल्हापूरमध्ये शूटिंग सुरू होतं. चित्रपटात जे कपडे घातलेत. ते दादाच्या मुंजीतले कपडे आहेत. झब्बा, कुर्ता आणि जॅकेट हे दादाचे कपडे मला घालून आणलं. त्या गाण्यात मी आहे आणि पहिल्यांदा मी सिनेमात नाचलीये,” असं मुक्ता म्हणाली.

हेही वाचा – ‘भाई’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान आला हृदयविकाराचा झटका अन्…; सागर देशमुखने सांगितला ‘तो’ गंभीर प्रसंग, म्हणाला…

दरम्यान, मुक्ताच्या आगामी कामाबद्दल बोलायचं झालं तर, परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ या चित्रपटात ती झळकणार आहे. या चित्रपटात मुक्तासह नम्रता संभेराव, सारंग साठ्ये, मायरा वायकुळ, सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, आशा ज्ञाते पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपट येत्या १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.