‘आई कुठे काय करते’ ही मालिका घराघरांत लोकप्रिय आहे. गेली अनेक वर्षे ही मालिका छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवत आहे. अरुंधतीसह या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांना आपलंसं करून घेतलं आहे. गेल्या काही वर्षात इशा, यश, अभि, संजना, अनघा, अनिरुद्ध, कांचन आजी या भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचा एक वेगळा चाहतावर्ग निर्माण झाला आहे.

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत आशुतोषच्या निधनानंतर सध्या अरुंधती पुन्हा एकदा अनिरुद्धच्या घरी राहायला आल्याचा सीक्वेन्स सुरू आहे. यामध्ये अनिरुद्धचं पात्र साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी घराघरांत लोकप्रिय आहेत. ते सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टची विशेष चर्चा रंगलेली असते. त्यांनी चाहत्यांबरोबर नुकताच एक किस्सा शेअर केला आहे.

_Morgan spurlock exposes fast food industry
‘मॅकडोनाल्ड’ कंपनीला दणका देणारे मॉर्गन स्परलॉक कोण होते?
actor shreyas talpade talks about movie kartam bhugtam
‘चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित होणे हेच यश’
Kartik Aaryan chandu champion first look poster out
कार्तिक आर्यनच्या ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटाच्या पोस्टरने वेधलं लक्ष, अभिनेत्याचा जबरदस्त लूक पाहून नेटकरी म्हणाले, “क्या बात है…”
madhoo relation with hema malini juhi chawla
माहेरी हेमा मालिनी तर सासरी जुही चावलाची नातेवाईक आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री; म्हणाली, “त्यांनी माझ्या पतीच्या…”
Akshay kumar movie with 15 heroines
अक्षय कुमारच्या ‘या’ चित्रपटात होत्या तब्बल १५ अभिनेत्री, ३० कोटींचं बजेट असलेल्या सिनेमाने कमावले होते…
mukta barve different look viral
मोठा चष्मा, वयस्कर लूक अन्…; ‘या’ अभिनेत्रीला ओळखलंत का? चित्रपटसृष्टीत २० वर्षे गाजवतेय अधिराज्य
Sanskruti Balgude is a fan of siddharth menon will work together in a film
संस्कृती बालगुडे आहे ‘या’ अभिनेत्याची फॅन; दोघंही लवकरच झळकणार एका चित्रपटात, अभिनेत्री म्हणाली, “…आणि शेवटी ते झालंय”
sakshi Tanwar
सीबीआय अधिकाऱ्याची लेक, IAS व्हायचं स्वप्न पण झाली अभिनेत्री; ५१ व्या वर्षीही अविवाहित ‘प्रिया’ आहे एका मुलीची आई

हेही वाचा : आधी रणबीरच्या ‘रामायण’ चित्रपटात एन्ट्री अन् आता कपूर कुटुंबीयांसह फोटोशूट! अजिंक्य देव यांची पोस्ट चर्चेत

मिलिंद गवळी यांनी करिअरच्या सुरुवातीला ‘लगान’, ‘मुन्नाभाई MBBS’ या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री ग्रेसी सिंहबरोबर काम केलं होतं. परंतु, हा चित्रपट काही कारणास्तव प्रदर्शित होऊ शकला नाही. याबद्दल त्यांनी खास पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

हेही वाचा : प्रार्थना बेहेरेने का सोडली मुंबई? नवऱ्यासह ‘या’ ठिकाणी थाटला संसार; कारण सांगत म्हणाली, “अभिला सतत…”

मिलिंद गवळी यांची पोस्ट

“रंग माझा वेगळा”
“हम काले है तो क्या हुआ दिलवाले है, हम तेरे तेरे चाहने वाले है”
“गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण”
लहानपणापासून गोरं असणं म्हणजे सुंदर अशी धारणा आजूबाजूच्या लोकांनी करून दिली होती. किती छान गोरा आहे वा किती सुंदर गोरी आहे हेच सतत कानावर पडत आलं होतं. फेअर अँड लव्हलीचा खप उगाच नाही वाढला आपल्या देशात, हळूहळू जसजसा मी मोठा होत गेलो तसं तसं माझ्या लक्षात आलं, माझी आई तिच्या सगळ्या बहिणींपेक्षा सावळी होती पण, ती त्या सगळ्यांपेक्षा खूपच सुंदर होती!

माझा खरा रंग कोणता आहे मला पूर्वी शाळा कॉलेजात कधी कळलं नाही, आपल्या चेहऱ्याचा रंग काळा असावा असंच मला वाटत होतं, सतत गोट्या ,भवरे, पतंग, क्रिकेट, सायकल चालवणे, उन्हात भटकणे हाच कार्यक्रम असायचा त्यामुळे, सतत उन्हात रापलेला चेहरा, काळा कुट्ट असायचा. त्यामुळे आईशिवाय दुसरं कोणीही मला ‘तू छान आहेस‘ ‘सुंदर आहेस‘ ‘गोड दिसतोस‘ वगैरे असं कधी कुणी म्हटलं नाही, कदाचित माझ्या आईला माझ्या चेहऱ्यापलीकडचा आतला मनातला रंग दिसत असावा.

मग मोटरसायकल चालवणं सुटलं आणि हळूहळू माझ्या चेहऱ्याचा रंग उजळत गेला, मग मला कळलं की, मी सावळ्या रंगाचा आहे, आणि हाच रंग आपल्या संपूर्ण भारतीयांचा पण आहे. अमेरिकेत युरोपमध्ये गोरे आफ्रिकेमध्ये काळे आणि एशियामध्ये सावळे गव्हाळ रंगाची माणसं असतात. मग मला कळलं की “beauty lies in the eyes of the beholder” आणि खरंच रंगावर काहीच नसतं. दुबईच्या सिटी मॉलमध्ये उभा असताना मला जगातल्या विविध रंगांच्या लोकांचं दर्शन झालं pink eskimos पाहिली, दुधापेक्षा पांढरीशुभ्र माणसं पाहिली, कोळशापेक्षा काळी कुट्ट माणसे पाहिली. जगातल्या वेगळ्या वेगळ्या भागातल्या माणसांचे वेगळे वेगळे रंग आणि सगळ्यांमध्ये आपापलं एक वेगळंच सौंदर्य, अदाचित त्या दिवसापासून मी माझ्या skin मध्ये comfortable आलो, त्या दिवसापासून मी आहे तसा स्वतःला Accept करायला लागलो,
Grass is always greener on the other side, जे सावळे असतात त्यांना गोरं व्हायचं असतं, आणि गोरे लोक tan होण्यासाठी आमच्या गोव्यामध्ये येऊन sunbathing करतात. I think we should accept the way we are, As long as our Skin is healthy and glowing, it does not matter what the colour of your skin is .

निरोगी शरीर आणि त्वचा हे सौंदर्याचं रहस्य आहे.
या ‘चंचल’ सिनेमामध्ये काळ्या गोऱ्या रंगाचाविषय मांडला होता.
दुर्दैवाने तो लोकांसमोर आलाच नाही,
ही माझी फिल्म रिलीज झालीच नाही.

हेही वाचा : सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोघांना गुजरातमधून अटक, पोलिसांनी व्हिडीओ केला शेअ

दरम्यान, मिलिंद गवळी यांचे चाहते सध्या त्यांना “आम्हाला हा संपूर्ण चित्रपट कुठे पाहायला मिळेल?” याबद्दल विचारपूस करत आहेत. याशिवाय अनेकांनी अभिनेत्याचा जुना व काहीसा वेगळा लूक पाहून आश्चर्य व्यक्त केलं आहे.