स्वरगंधर्व सुधीर फडके… मराठी घराघरांत आणि मनामनात पोहोचलेलं एक अजरामर नाव. मराठीसह हिंदी गायक, संगीतकार म्हणून त्यांनी संगीतप्रेमींच्या मनात एक ठसा उमटवला. पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी आपल्या गायकीने आणि संगीताने प्रेक्षकांना भुरळ घातली. ‘गीतरामायणा’तील गोडव्याने, भावविभोर गीतांनी ‘बाबुजीं’नी मराठी मनावर राज्य केलं. अशा या रसिकमनाचा ठाव घेणाऱ्या ‘बाबुजीं’ची जीवनगाथा सांगणारा ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा चित्रपट येत्या १ मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. रामनवमीच्या पूर्वसंध्येला या चित्रपटाचा भव्य ट्रेलर लाँच सोहळा राज ठाकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी चित्रपटातील टीमसह अन्य मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात चित्रपटातील ‘गीतरामायण’मधील बहारदार गाणी ऐकायला मिळाली.

‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटाच्या निमित्ताने बाबुजी आणि त्यांच्याबरोबर काम केलेल्या अनेक नामवंताची असंख्य गाणी व जीवनप्रवास या माध्यमातून उलगडणार आहे. या चित्रपटात एकूण २७ गाणी असून या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना एक अनोखा संगीत नजराणा मिळणार आहे. चित्रपटाची निर्मिती सौरभ गाडगीळ आणि योगेश देशपांडे यांनी केली आहे. याशिवाय सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, सागर तळाशीकर, मिलिंद फाटक, आदिश वैद्य, सुखदा खांडकेकर, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर, शरद पोंक्षे, उदय सबनीस, चिन्मय पटवर्धन, निखिल राऊत, विभावरी देशपांडे, धीरेश जोशी, परितोष प्रधान यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट योगेश देशपांडे यांनी दिग्दर्शित केला असून चित्रपटाची कथा, पटकथा, संवादही त्यांचेच आहेत.

Mrunmayee Deshpande talks about her character in Swargandharva Sudhir Phadke Movie
इन्स्टाग्रामवरील ‘या’ रीलमुळे मृण्मयी देशपांडेला ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटात मिळाली भूमिका, म्हणाली, “माझ्याबाबतीत…”
DD news anchor faints during live news reading
Heatwave : उष्माघाताची बातमी देताना दूरदर्शनची अँकर स्टुडिओतच कोसळली, VIDEO व्हायरल
sonali khare clarifies age difference between husband and her
“आमच्यात २७ वर्षांचं अंतर नाही”, सोनाली खरेने थेट सांगितली नवऱ्यासह तिची जन्मतारीख; म्हणाली, “बायका त्यांचं वय…”
marathi actress Supriya Pilgaonkar react on chinmay mandlekar getting trolled for his son name jehangir
“जहांगीर…”, चिन्मय मांडलेकरच्या लेकाच्या नावावरील ट्रोलिंगवर सुप्रिया पिळगावकरांची मार्मिक पोस्ट, म्हणाल्या…

हेही वाचा : “सलमानला जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार”, पोलिसांनी दिली माहिती; म्हणाले, “दोन्ही आरोपी…”

चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला राज ठाकरे उपस्थित होते. ते ट्रेलरचे कौतुक करताना म्हणाले, “मला बाबुजींचा सहवास फारसा लाभला नाही. परंतु, माझ्या वडिलांचे आणि बाबुजींचे जवळचे संबंध होते. बाबुजींना जवळून भेटण्याचा योग आला नाही. बहुदा हा योग सुनिल बर्वेंमुळे येईल. बाबुजींची सगळीच गाणी अजरामर आहेत. त्यांच्या गाण्यांची खासियत म्हणजे एखाद्याला नवसंजीवनी देणे. उभारी देणे. मला खात्री आहे, या चित्रपटाला नक्कीच प्रेक्षकांची पसंती मिळेल.’’

हेही वाचा : अमिताभ बच्चन यांना यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार घोषित; ए.आर. रेहमान, अशोक सराफ, अतुल परचुरे यांना देखील विशेष पुरस्काराने गौरवणार

दिग्दर्शक योगेश देशपांडे म्हणतात, “आजचा हा दिवस खूपच आनंददायी आहे. कलाप्रेम राज ठाकरे यांच्या उपस्थितीने या सोहळ्यात अधिकच रंगत आणली. फडके आणि ठाकरे कुटुंबाचे अत्यंत निकटचे संबंध आहेत. स्वरगंधर्व सुधीर फडके यांचे संगीत क्षेत्रातील योगदान सर्वश्रुतच आहे. परंतु इथवर पोहोचण्याचा त्यांचा प्रवास तसा खडतर होता. त्यांच्या या प्रवासात पत्नी ललिताबाई, ग. दि. माडगुळकर हे त्यांच्याबरोबर होतेच. परंतु, या प्रवासात त्यांना इतर अनेकांनी साथ दिली. त्यांच्या भावसंगीताचा हा रंजक प्रवास या चित्रपटातून मांडण्याचा आमचा प्रयत्न केला आहे.”